पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Moon
आज कोजागिरी…
पूर्ण चंद्र…
प्रकाशाचा सडा…
गप्पा, गोष्टी, गाणी अशी छान मैफिल जमवायची…
आणि गुलजा़रना आठवायचं… चंद्रप्रकाश अजूनच घनदाट होतो. निरवतेचा खोल तळ गार स्पर्शिला होतो. हुरहूर असते वातावरणात. कुणीतरी कुणाची वाट बघत असतेय… तर कुणीतरी कुणाच्यातरी आठवणीत दंग झालेले असतेय.
मेघना गुलजा़रचा ‘चाँद परोसा हैं…’ शब्दशः अनुभवायला मिळते तिथे…
रोज आता है ये बहरुपिया
इक रूप बदलकर
रात के वक्त दिखाता है
‘कलायें’ अपनी…
और लुभा लेता है
मासूम से
लोगोंको अपनी अदा से…
पूरा हरजाई है
गलियोंसे गुजरता है
कभी छत से बजाता हुआ सीटी
रोज आता है
जगाता है
बहुत लोगोंको शब भर…
आज की रात उफ़क़ से
कोई चाँद निकले
तो गिरफ़्तारही कर लो …!!!
गुलाजा़रचा चंद्र वेगळाच आहे नै !
गुलज़ारचे चंद्र असे वणवण करत शोधत फिरत बसायची खरोखरच गरज नसते… आपल्या अंगणात येऊन पोचणार्या
वळणदार रस्त्यावरुन…
इक राह तो वो होगी,
तुम तक पहुँचती हैं,
इस मोड से जाती हैं…
असे म्हणत म्हणत
‘चाँद से होकर सडक जाती है..’
ते कधीचेच आपल्या अंगणात उतरलेले असतात… पिवळसर दुधी फेसाळ…
गुलज़ारचे चंद्र कधीच नजरेआड न होणारे…
या टप्प्यावर सगळ्यांच्याच हक्काचे हे आठवणार म्हणजे आठवणारच…
संजीवकुमार – सुचित्रा सेन
आरडी, किशोर, लता
तुम जो कह दो तो
आजकी रात चाँद डूबेगा नहीं
रात को रोक लो
रात की बात है
और
ज़िंदगी बाकी तो नहीं
तेरे बिना जिंदगी से कोई
शिकवा तो नही… शिकवा नही…
यातला चंद्र वेगळाच… हुरहूर लावणारा… भारावून ठेवणारा… हातातून निसटलेल्या आनंदाची आठवण करुन देणारा…गहिवरुन आल्यासारखं होतं हे गाणं आठवताना… संजीवकुमार, सुचित्रा सेन, आरडी, किशोर सगळ्यांची एक्झिट झाली पण तो गुलजा़रचा चंद्र अजून तसाच रोमँटिक आहे… कुठल्याही मैफिलीत या चंद्राला विसरणे शक्यच नाही…
तर कधी कधी गुलजा़र अशा निरव शांततेच्या गारव्यातही चरचरीत चटका लावून ठेवतो…
कभी चाँद की तरह चमकी
अठन्नीसी ये ज़िंदगी…
आणि मग इथून गुलजा़र स्वतःमधेच हरवतात… कुठेतरी लांब जातात… आपल्याही लांब घेऊन जातात… निरव होतात… कधीतरी सुनसान रात्री कुठल्यातरी महानगराच्या शांत थकून पडलेल्या रस्त्यावरुन फिरताना त्यांना रस्त्याच्या एका कोपऱ्यात केस विस्कटून भुकेने विषण्ण होऊन बसलेल्या त्या मुलीच्या डोळ्यांतून रोटीसारखा चंद्र दिसतो…
माँ ने जिस चाँदसी दुल्हन की
दुआँ दी थी मुझे
आजकी रात वह
फुटपाथसे देखा मैंने
… रात भर रोटी नजर आया है
वो चाँद मुझे !
मैफिल शांत होते क्षणभरच !…
दूध मंद आचेवर दाट सायीचे पांघरुण पसरुन चंद्रप्रकाशाला त्यावर खेळवत असतंय..
क्या बतायें के जाँ गयी कैसे
फ़िरसे दोहरायें वो घड़ी कैसे…
किसने रास्ते में चाँद रख्खा था
मुझको ठोकर वहाँ लगी कैसे…
काय म्हणायचं ?
या अशा मैफिलीत असेही न वाचलेले, न भेटलेले चंद्र भेटतात… समोर येतात आणि आपला नविन मेकओव्हर दाखवतात.
आजच्या दिवशीच गुलजा़रचा ताटकळत ठेवणारा चंद्रही येतो भेटायला…
मैं एक सदीसे बैठी हूँ
इस राहसे कोई गुजरा नहीं
कुछ चाँदके रथ तो गुजरे थे
पर चाँदसे कोई उतरा नहीं…
लेकीन मधली डिंपल आठवते या पौर्णिमेच्या चंद्रासोबत !
गुलजा़रचा चंद्र धकाधकीच्या जगण्यातलाही आहेच की…
चाँद का टीका मथ्थे लगाके
रातदिन तारोंमें
जीना-वीना ईझी नही !
किती खरं आहे हे आज ! खरंच चाँद कि टीका… यशाचे शिखर ! पण ते यश टिकवून जगण्याची धडपड सोपी आहे ?
या अशा परिस्थितीत मग झोप उडते… तिथे गुलजा़र सांगतात…
एक ख़्वाब लें
एक ख़्वाब दें
नींद का सौदा करें…
एक ख़्वाब तो आँखो में है
एक चाँद तो तकिये तले…
किती गहिरं आहे हे !
चंद्र किती वेगवेगळा असू शकतो… त्याची सगळी रुपे हवीहवीशी वाटतात… ते सगळे चंद्र आपल्या अंगणात असावेत
असं वाटायला लागतं…
डोरियोंसे बाँध बाँध के
रात भर चाँद तोडना
ये मुझे क्या हो गया ?
क्या बात है ?
आणि मग ती रात्र असते…
रोज अकेली आये रोज अकेली जाये चाँद कटोरा लिए भिखारन रात…
काय आणि कसं उतरवतो हा गुलजा़र नावाचा माणूस हे सगळे चंद्र हे एक अनाकलनीय कोडंच आहे !
अपेक्षा असते…
एक बूँद है चंदा की
आकाश समंदर मे
दो हाथों की ओस मिली
गिर पडता तो क्या होता
हाथों मे ख़ुदा होता…
असं म्हणता म्हणता
असं जगता जगता
अचानक समजून जातं
जगण्याच्या आनंदाचं कोडं सुटतं…
बहुत बरस जब गुजर गये
और
लाख चाँद तब उतर गये…
पुखराज मधला चंद्र मग अवतरतो…
जब जब पतझड में
पेडोंसे पीले पीले पत्ते
मेरे लॉन में आकर गिरते हैं
रातको छतपर जाके
मैं आकाश को तकता रहता हूं
लगता है क़मजोर सा
पीला चाँद भी शायद
पीपल के सूखे पत्ते सा
लहराता-लहराता
मेरे लॉनमें आकर उतरेगा…
असाच हा चंद्र आपल्या सर्वांच्या जगण्यात असायला हवा !
आज या कोजागिरीच्या दिवशी आपणा सर्वांना तुमच्या आवडता चंद्राची सोबत सदैव मिळो.
-©उमेश कुलकर्णी
चंद्र | Moon हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
चंद्र | Moon – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “चंद्र | Moon”