Zalya Tinhisanja

झाल्या तिन्हीसांजा | Zalya Tinhisanja

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Zalya Tinhisanja

अजुनी कसे येती ना, परधान्य राजा
किरकिरती रातकिडे, झालया तिन्हीसांजा ll धु.ll

उशीर होई काढाया गाईच्या धारा
शालु हिरा कालवडी देती हुंकारा
टवकारिती कान जरी वाजे दरवाजा ll १ ll

वाट तरी सरळ कुठे पांदितिल सारी
त्यांतुनी तर आज रात अंधारी भारी
आणि बैल कसल्याही बुजती आवाजा ll २ ll

‘जेवणार मी पुढ्यात’ घाली मधु रुंजी
झोपेने पेंगुळली तरी न नीजे मंजी
आणि किती करती आंत -बाहेरी ये-जा ll ३ ll

निवल्यावर हुरड्याच्या उसळीस न गोडी
लवकर कां सोडिती न मोट तरी थोडी
अधिकाधिक खाली-वर होई जीव माझा ll ४ ll

गुरगुरला जो पिसाळ काल जरा कांही
म्हणती त्या मेल्याला काळीज की नाही
परि पाठीराखी ती आहे अष्टभुजा ll ५ ll

-यशवंत

Share Zalya Tinhisanja

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock