पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Bachchan Day …
आजचा दिवस, ‘बच्चन’ दिवस… (Bachchan Day …)
आजचा दिवसच काय घेऊन बसलात राव हे आमचं आख्खं आयुष्यच बच्चनने बनवलेय… उसी के नाम हैं ये जिंदगी !
लेकानं कळत्या वयाच्या थोडं आधीपासून बोट पकडलंय ते आजतागायत सोडलेलं नाही.
आज या दोस्ताला ८० वर्षे पूर्ण झाली… वाटत नाही राव !
५० वर्षे… नॉट अ जोक ! ५० वर्षे असं राहायचं प्रत्येका सोबत, प्रत्येक क्षणी अवघड आहे ! काल परवाच भेटलांय असंच अजूनही त्याच्याकडे बघितले की वाटतं…
या ५० वर्षात काय दिलं नाही या माणसानं असं विचार करुन करुन डोक्याचा भुगा केला ना तरी काहीही सापडत नाही !
जेवढं लिहू तेवढं कमीच आहे या माणसाबद्दल !
जेवढं लिहू तेवढं कमीच आहे या माणसाबद्दल !
एक गोष्ट मान्य करायला काहीच हरकत नाही जाहीरपणे की बाबा रे, तू आम्हांला आयुष्याचा आनंद भरभरून देतोयस ! भरपूर रंगतदार बनवतोयस आमचं जगणं !
अजूनही तुझ्या आवाजात…
‘पीटर…’ अशी हांक कानावर आली की शहारा येतोय त्या आवाजाचा, त्यात गच्च भरलेल्या आत्मविश्वासाचा !
घुसमटल्या आवाजात, ‘चाँदनी…’ असं ऐकायला आलं की समोर येतोयस तू आणि, ‘ये रात हैं या तुम्हारी जुल्फें खुली हुई हैं… क्यूँ दिल में सुलगते रहें, लोगों को बता दे हाँ हमको मोहब्बत हैं, मोहब्बत !’ हे ऐकायला येतंय !
‘जिंदगी तो बेवफा हैं…’ त्या कुठल्यातरी रस्त्यावरच्या वळणावर मोटर सायकलवर तू दिसतोस !
फोर्टमधल्या कमानीतून फिरताना ७८६ बिल्ला सापडतो आणि समोर तू दिसतोस, ‘डावरसाब मेरे पीछे सिर्फ मेरी तकदी़र होगी…’ हे सांगणारा !
बंगलोरजवळच्या रामनगर जवळून जाताना तिथल्या भल्यामोठ्या दगडावर डाव्या हातातली बंदूक रोखलेला तू दिसतोस, ‘ गब्बर, अपने आदमियों को कह दे की बंदूके फेंक दे वरना भून के रख दूँगा…’ खणखणीत आवाजातून तू भेटतोयस रे !
‘वीरु, तेरे बच्चों को कहानी सुनाना तो बाकी रह गया यार… लेकिन तू जरु़र सुनाना ये अपनी दोस्ती की कहानी…’
संजीवकुमार, दिलीपकुमार यांच्यासमोर तेवढ्याच ताकदीने,समर्थपणे उभा राहीलास तू… त्रिशूल आणि शक्ति !
‘नो मीन्स नो…’ किती खणखणीत पटवून दिलेयस तू !
‘मुझे जो सही लगता हैं, वोही मैं करता हूँ, चाहे वो भगवान के खिलाफ हैं, समाज के खिलाफ हैं, पुलिस, कानून… या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यूँ ना हो…’
सरकार आहेस तू, सरकार !
१९७८ मधेच तू जाहीर केलं होतंस…
‘डॉन को पकडना मुश्किल ही नही, नामुमकिन हैं…’
खरंच मित्रा… तुस्सी ग्रेट हो !
एक सांगू का, रेखा नंतर झीनतही मस्त दिसली रे तुझ्या सोबत… खुलत होती झीनत तुझ्या सोबत स्क्रीनवर… आठवतंय का रे… डॉनमधे ‘एक कन्या कुँवारी, हमरे दिल में उतर गयी हाय…’ म्हाणतोस तेव्हा लाजलेली झीनत आणि नंतर तिने तुझ्यासोबत केलेल्या त्या डान्सिंग स्टेप्स… भन्नाट रे ! तसंच व्हेनिसमधल्या वॉटरवे मधले ते नावेतले गाणे… अं हं… ऐसे नही गाके सुनाओ ना…’ येस्स सर, यू आर राईट… ‘दो लब्जों की दिल की कहानी…’ आईशप्पथ सांगतो रे कसले तुम्ही दोघंही चेरी ब्लॉसमसारखे टवटवीत दिसला आहात… खूळ लागतंय आजही ते गाणं बघितलं की !
आम्ही आपलं कृष्णा कोयनेच्या प्रितीसंगमात लाकडी नावेत बसून बायकोला सोबत घेऊन तो प्रकारही केला आणि खरं सांगतो रे लै भारी रंगतदार मैफिल जमली बघ !
बच्चन… यू आर सिंप्ली ग्रेट यार !
अनेक जणांना तू इन्स्पायर केले आहेस… अगणित जणांसाठी तू जीवाभावाचा मैतर बनून राहिलायस…
तू म्हणतोस तसं, ‘टॉपला पोहोचणं तसं फार अवघड नसतंय पण तिथे सतत राहणं, ती पोझिशन सस्टेन करणं हेच अवघड असतं !’
पण हे तू सहजसाध्य केलं आहेस… करतोयस !
आणि म्हणूनच आजही तूच शहेनशाह !
तूच सरकार… तूच डॉन… तूच सिकंदर… तूच विजय… तूच जय !
वाढदिवसाच्या कोट्यानुकोटी शुभेच्छा !
‘बच्चन’ दिवस… |Bachchan Day … -©️उमेश कुलकर्णी
‘बच्चन’ दिवस… |Bachchan Day … हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
‘बच्चन’ दिवस… | Bachchan Day … – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.