पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Mama (Uncle) – A Loving Relationship
परिस्थिती ने गरीब असला तरी मामाच प्रेम मात्र कायमचं श्रीमंतच असत…!!
मामा दोन अक्षरी पण एक भारदस्त व आईच्या गणगोतातील आईच्या सर्वात जवळच नातं. आईपेक्षा वयाने लहान जरी असला तरी आई त्याला आदराने भाऊच म्हणणार…. आईच्या प्रत्येक हाकेला धावणारं व आईच्या हक्कासाठी तीच्या सासरच्या मंडळीं बरोबरही दोन हात करण्याचं धाडस करणार एक उमद नात.
बालपणात अंगाखांद्यावर खेळवणारा मामा आपण वयाने जसं मोठे होतं जातो तसच बारीक लक्ष ठेवुन राहतो.बालपणात आईबरोबर मामाच्या गावाला गेल्यावर,प्रवासाची दणदण होऊन जर रात्री अपरात्री आपल्याला दुखंन आल्यावर दवाखान्यात नेणारा मामा आठवला का मन हाळंव होतं.मामांनी दिवाळीला घेतलेले कपड्यांची बातच न्यारी असायची,तो कायम बजेट करुन दुकानात यायचा आण आम्ही त्यांचं बजेट कायम मोडीत काढायचो.तरीही मामाचा चेहरा हसराच असायचा.
लहाणपणी सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर तिथं फक्त आईच्याच नावाने का ओळखले जातं?या प्रश्नाच उत्तर आत्ता मिळालं.एखाद्या दिवाळीला मामाने जर कपडे नाही घेतले तर मामाच्या मोठेपणा कमी होऊ नये म्हणून आईने स्वत:च्या पैशात मामाचं नाव करुन घेतलेले कपडे ही असायचे.उभ्या आयुष्यभर सासरी मोकळा श्वास घेणारी व भावच्या दबावावर सासरी नांदाणारी बहीणीला भाऊ का एवढा का प्रिय असतो,हे आपणास बहीणीचा भाऊ झाल्यावरच कळत.असा हा मामा आपण लग्ना योग्य झाल्यावर प्रतेक सोयरीकीत मामा कुठले आहेत असं विचारुन आईच्या माहेरचा मोठेपणा व महत्व वाढवतो.लग्नात वधुवराच्या मागे उभा असणारा मामा जीवात जीव असेपर्यंत साथ देतो व आईने हाताला बांधलेल्या धाग्यांच कर्ज उभ्या आयुष्यभर फेडतो…
हे कुणी लिहिलं माहिती नाही… पण मामावर खरचं खुप छान लिहिलयं..
मामा – एक प्रेमळ नात | Mama (Uncle) – A Loving Relationship हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “मामा – एक प्रेमळ नात | Mama (Uncle) – A Loving Relationship”