पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Halloween
लोकानो आपल्या संस्कृतीत भूत खेत या विषयापासून दूर रहायला शिकवले आहे, त्याविषयी विनाकारण चर्चा कोठेही होत नाही. या विषयाच्या बाबत कोणतीही fantacy आपल्या संस्कृतीत तरी अजिबात नाही. आपल्या च काय भारतात नांदणाऱ्या इतर संस्कृतीत देखील ही संकल्पना नाही. तरीही अचानक नवीन फेस्टिव्हल (Halloween Festival) बर का ! आपल्यावर थोपवला जात आहे. आणि हे कोणासोबत आपल्या घरात येत आहे माहीत आहे ? लहान मुलांमार्फत !
आजकाल शाळेत नवीन फॅड निघाली आहेत, आणि आज जरी ही फॅड आणि फॅशन वाटली तरी थोड्याच काळात भारतीय संस्कृतीचा भाग बनतील. कस ? कारण लहान मुलांना नर्सरी च्या वयापासून ही भुताटकी फेस्टिव्हल (Ghost Festival) आपला वाटू लागेल,मग ते लहान भावंडाना या बाबत प्रोत्साहित करतील पुढे जाऊन त्यांच्या मुलांना सांगतील बाबांनो हीच आपली संस्कृती ! हे सगळं हवंय का तुम्हाला ????????????
माझ्या मोठ्या मुलीच्या नर्सरी च्या वयात यातील कोणतीही गोष्ट शाळेत नव्हती, 2018 पासून अचानक शाळेत याचे गोडवे गायले जात आहेत, पूर्ण आठवडा यात व्यतित होत आहे, हळूहळू महिनाभर याचे सेलिब्रेशन सुरू होईल. लोकानो तुमच्या लहान मुलांच्या शाळेत हे उसने फेस्टिव्हल सुरू झाले असतील तर त्याला विरोध करा, आपल्या संस्कृतीत असे असंख्य सण आहेत जे काही चांगला संदेश देतात. ज्याने मुलांवर चांगले संस्कार होऊ शकतात. परंतु हे कोणतेही आगा पिच्छा नसलेले बिन बुडाचे नवीन फेस्टिव्हल विनाकारण सुरू करू नका.
हा एक छानसा मार्केटिंग फंडा आहे, ज्यायोगे याविषयाशी निगडित भरपूर वस्तू विकल्या जाव्यात.असाच तो व्हॅलेंटाईन दिवस (Valentine’s Day) भारतात आलेला नंतर तरूणाई ला भुरळ घालून करोडोंचा व्यवसाय केला, आता आणि हे एक नवीन भूत डोक्यावर बसवून घेऊ नका. शाळेत असले दिवस साजरे होत असतील तर त्यांना प्रश्न विचारा की यातून कोणते संस्कार होतात बर आमच्या मुलांवर ?? भुतासारखे वागू नयेत म्हणून आम्ही शाळेत घालतो न ? मग आता भूत ही संकल्पना आमच्या कोवळ्या मुलांना माहीत नाही तर त्यांना या निमित्ताने आम्ही का सांगावी ?? सगळे चांगले विषय लहान मुलांना शिकवून संपले का ? की सरते शेवटी हा विषय शिकवायची वेळ आली ??
कोवळ्या मुलांना धड देव ही संकल्पना ठाऊक नसते, नेमकं याच वयात त्यांना भूतखेत यांची संकल्पना शिकवायची ?? का कशासाठी ??
–©मधुरा पेठे
हॅलोविन | Halloween हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
हॅलोविन | Halloween – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
2 thoughts on “हॅलोविन | Halloween”