पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
कोणी तरी विचारला मला, तू काय करते
अरे काय सांगू तुला , मी तर घरीच असते
अगं असं कसं , तू ही करत होतीस ना जॉब
अरे काय सांगू तुला , बाळ झालयावर सोडला जॉब
अगं असं कसं , तू हा वेडेपणा केलास
अरे काय सांगू तुला , मला होती बाळाची आस
अगं बाळ झाल मोठ, आता जॉब तू करू शकतेस
अरे काय सांगू तुला , कोणी नाही सांभाळायला बाळास
अगं घेऊन मदत आई किंवा सासूची, जॉब तू करू शकतेस
अरे काय सांगू तुला , याचा आहे खूप मोठा इतिहास
अगं मग लाव ना बाई, पण तू हो इंडिपेंडंट
अरे काय सांगू तुला , बाई वर कशी राहू डिपेंडेंट
अगं तू खूप शिकलीस , का घालवते शिक्षण वाया
अरे जॉब केला नाही तर , लगेच जात नाही शिक्षण वाया
अगं ऐक ना, सांगतोय एक मित्र म्हणून मी
अरे बाहेर आहे कोरोना, घेणार नाही बाळाची रिस्क मी
अगं ऐक ना,सजेस्ट केला फक्त मी
अरे बाळ मोठ झाला की, करीनच जॉब मी
-©️भाग्यश्री पेंढरकर
Nice thoughts. Khup chan kavita aani khup chan lekhan.