मराठी सुविचार

या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल…

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

कलयुग नाही मतलबी युग चालू आहे…

या भुतलावर, दानासारखा दुसरा धर्म नाही, लोभासारखा दुसरा शत्रू नाही, सौजन्यासारखे दुसरे भूषण नाही. आणि संतोषाएवढे धन नाही.