राष्ट्रीय सर्वोत्तम मित्र दिन

1935 मध्ये, यूएस कॉंग्रेसने घनिष्ठ मैत्रीचा आदर करण्यासाठी एक दिवस देण्याचा निर्णय घेतला. हा हलकासा, अतिशय मजेशीर अद्भुत दिवस आहे जो ओळखला आणि साजरा केला पाहिजे.

मित्र आणि मैत्री 8 जून रोजी राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड्स डेला जपली जाते आणि साजरा केला जातो.

खास दिवशी तुमच्या जिवलग मित्रांसोबत शेअर करण्यासाठी शुभेच्छा, मेसेज आणि कोट्सची सूची येथे आहे..

आयुष्य नावाची Screen  जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशी ही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार.

माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल.

मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात.

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी.