निर्जला एकादशी 2022

ज्येष्ठ शुक्ल एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळले जाते. यावेळी निर्जला एकादशीचे व्रत 10 जून रोजी ठेवण्यात येणार आहे. या व्रतामध्ये पाणी पिणे वर्ज्य मानले जाते, म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात.

याला भीमसेनी एकादशी, पांडव एकादशी आणि भीम एकादशी असेही म्हणतात.

निर्जला एकादशीचा शुभ मुहूर्त 10 जून 2022 सकाळी 7.25 वाजता   11 जून संध्याकाळी 5:45 पर्यंत 

वर्षभर एकादशी व्रत पाळणे शक्य नसले तरी केवळ निर्जला एकादशी व्रत पाळले तर सर्व एकादशी व्रत फलदायी होतात असे म्हणतात.

निर्जला एकादशीचे व्रत करणार्‍यांनी भगवान विष्णूची आराधना करून त्याची स्थापना करावी. पंचामृताचा नैवेद्य भगवान विष्णूला दाखवावा. अभिषेक करावा. अभिषेकानंतर गंध, अक्षत, तुळशीची पाने, फुले, फळे अर्पण करा. यानंतर धूप, दिवा आणि प्रसाद दाखवून भगवान विष्णूची आरती करावी.विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. जमेल तेवढे दान करा. तसेच 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करा.

व्रत करताना कोणाचाही अपमान करू नये. पूजा करताना कोणाचाही मत्सर करू नका. शक्य असल्यास रात्री जमिनीवर झोपावे. निर्जला एकादशीचे व्रत कठोर आहे.