विविध सण आणि पूजेसाठी खास उखाणे

उखाण्यांचा इतिहासाविषयी फारसे माहिती नसले तरी, महाराष्ट्रातील प्रत्येक सणाला उखाणे उपलब्ध आहेत. अगदी पूजेपासून संक्रातीपर्यंत. मग सत्यनारायणाची पूजा असो की दिवाळी पूजा, नाव घेण्याची म्हणजेच उखाणा घेण्याची पद्धत असते.

मंगळागौरीसाठी उखाणे

मंगळा गौर हे हिंदू धर्मातील व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित जोडप्याला लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावी लागते. त्यासाठी ते इतर नवविवाहित जोडप्यांनाही बोलावतात आणि सकाळी एकत्र पूजा करतात आणि नंतर रात्री जागरण करतात.

मंगळागौरी माते नमन करते तुला….रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते….. रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

हळदीकुंकवासाठी उखाणे

हळदी-कुंकू ही हिंदू महिलांशी संबंधित एक धार्मिक संकल्पना आहे. सुवासिनी महिला एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात.  महिलांना विशेष पूजा, उत्सवासाठी बोलावून त्यांच्या कपाळावर हळद आणि कुंकू लावले जाते. काही ठिकाणी ओटीही भरली जाते.

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

कान भरण्यात, बायका आहेत हौशी…..रावांचा नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

मकरसंक्रांतीसाठी उखाणे

पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या केवळ चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.

रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा

तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत

सत्यनारायण पूजेसाठी उखाणे

पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या केवळ चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.