आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणतात. एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि अनेक प्रकारची पापे नष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे. यावेळी 24 जून रोजी योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे.
ज्योतिषशास्त्राच्या कालगणनेनुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी 23 जून रोजी रात्री 9:41 वाजता सुरू होईल. 24 जून रोजी रात्री 11:12 वाजता एकादशी तिथी समाप्त होईल.
योगिनी एकादशीनंतर देवशयनी एकादशी साजरी केली जाते. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू ४ महिने योगनिद्रात जातात. यानंतर शुभ कार्ये पूर्णपणे निषिद्ध आहेत. त्यामुळे योगिनी एकादशीला खूप महत्त्व दिले जाते.