लग्नाच्या समारंभासाठी मराठी उखाणे

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायक क्षण म्हणजे लग्न होय. संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. उखाण्याची वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विवाह सोहळ्यासाठी उखाणा आहे. मग ती लग्नाच्या वेळी असो किंवा मंगळसूत्र घालण्याच्या वेळी.

चला अशाच काही लग्नाच्या समारंभासाठी मराठी उखाणे पाहू......

नवरीसाठी उखाणे

रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा.

सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात….रावांचे नाव घेते, ….च्या घरात.

नवरदेवासाठी उखाणे

कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, …… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

गृह प्रवेश करतानाचे मराठी उखाणे

 सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश… रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary…रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry.

जेवताना घास भरवण्याचे मराठी उखाणे

चांदीच्या ताटात, पक्वान्नांची रास…रावांना देते, …चा घास.

अगं अगं …, खिडकीत आला बघ काऊ…घास भरवतो….चा, बोटं नको चाऊ.