Marathi Ukhane for Marriage Ceremony

Marathi Ukhane for Marriage Ceremony

लग्नाच्या समारंभासाठी मराठी उखाणे (Marathi Ukhane for Marriage Ceremony)

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायक क्षण म्हणजे लग्न होय. संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. उखाण्याची वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विवाह सोहळ्यासाठी उखाणा आहे. मग ती लग्नाच्या वेळी असो किंवा मंगळसूत्र घालण्याच्या वेळी.

चला अशाच काही लग्नाच्या समारंभासाठी मराठी उखाणे पाहू.

Marathi Ukhane for Marriage Ceremony


Marathi Ukhane for Marriage Ceremony
  1. मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
  2. पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे …रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे.
  3. पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
  4. आकाशाच्या अंगणात सूर्य-चंद्राचादिवा ….रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा.
  5. मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध…. सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद.
  6. खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
  7. माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने….राव आहेत सोबत,  मग मला कशाचे उणे.
  8. छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
  9. सर्वांन पुढे नमस्कारासाठी जोडते दोन हात……..रावांचे नाव घेतेआता सोडा माझी वाट.
  10. दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी… रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
  11. कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,…राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती.
  12. सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात….रावांचे नाव घेते, ….च्या घरात.
  13. नाचत नाचत वाजत गाजतआली आमची वरात…रावांचे नाव घेते….च्या दारात.
  14. राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.
  15. रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा.
  16.  मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती. 
  17. दही,दूध,तूप,लोणी…..रावांचे नाव घेते मी त्यांची राणी.
  18. सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही …रावांचे नाव हळूच ओठी येई.
  19. लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.
  20. संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला…रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला.
  21. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.
  22. उंबरठ्यावरील माप देते ,सुखी संसाराची चाहूल… च्या जीवनात टाकले मी आजपहिले पाउल.
  23. चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा …रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.
  24. गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
  25. संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी.
  26. अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,… रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.
  27. अभिमान नाही संपत्तीचागर्व नाही रूपाचा….रावांना घास भरवते वरण भात तुपाचा.
  28. संसाराच्या सागरात, प्रेमाच्या लाटा…रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
  29. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल.
  30. मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर…रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर.
  31. ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.
  32. दुधाचा केला चहा चहाबरोबर होती खारी …….राव हे जगात लयभारी.
  33. हिरव्या हिरव्या साडीचा, पिवळा काठ जरतारी…रावांचे नाव घेताच येई, चेहऱ्यावर तरतरी.
  34. कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.
  35. सासरची छाया,  माहरेची माया, ….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया.
  36. कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
  37. पैठणीवर शोभे, नाजूक मोरांची जोडी…मुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
  38. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.
  39. लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.
  40. शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन.
  41. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं…रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं.
  42. यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, … रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.
  43. आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम…सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.
  44. पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार.
  45. चांदीच्या ताटाभोवती, रांगोळी काढली मोरांची…रावांच नाव ऐकायला, गर्दी जमली पाहुण्यांची.
  46. दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांचीच नाव घेते, सून मी …ची.
  47. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून…रावांचं नाव घेते….ची सून.
  48. शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,आता ….राव माझे जीवनसाथी. 
  49. करवंदाची साल चंदनाचे खोड,… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड. 
  50. शेल्याशेल्याची बांधली गाठ…रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ.  
  51. माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा…राव त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.
  52. शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षायुक्तीने……… रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
  53. सुखी संसाराची करतोय,आम्ही आता सुरुवात …………..वर ठेवा कायमतुमचा प्रेमळ मायेचा हात.
  54. गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा………..रावांचे नाव घ्याला मलाकधीही सांगा.
  1. काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, …..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. 
  2. एक होती चिऊ आणि एक होता काऊ … च नाव घेतो, डोकं नका खाऊ. 
  3. फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, …. च्या नादाने झालो मी बेभान.
  4. निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे …च नाव घेतो, लक्ष द्या सारे.
  5. कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, …… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
  6. भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
  7. पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
  8. आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे …च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
  9. …. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल. 
  10. लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
  11. आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा …च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
  12. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, …. चे नाव घेतो ऐका देऊन कान. 
  13. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
  14. संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी …. म्हणते मधुर गाणी. 
  15. प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
  16. पाच बोटातून होते कलेची निर्मिती, …. वर जडली माझी प्रीती.
  17. गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.
  18. प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा …शोधून नाही सापडणार, ….सारखा हिरा.
  19. वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर… हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर. 
  20. ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा…मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
  21. केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळ, हिचं नाव घेतो, वेळ न घालवता वायफळ. 
  22. दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
  23. गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा…च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा. 
  24. चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली. 
  25. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
  26. अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम, हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम. 
  27. लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …आल्यापासून  झालंय, आयुष्य खूपच मस्त.
  28. आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, …..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
  29. टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
  30. निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.
  31. अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
  32. माधुरीच्या अदा, कतरीनाचं रूप… ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
  33. उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी.
  34. …च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,…ला पाहून, पडली माझी विकेट.
  35. कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
  36. तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी…बघताक्षणी प्रेमात पडलो,… ची लाल ओढणी.
  37. दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग…सुखी आहे संसारात, ….च्या संग.
  38. हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.
  39. झुळूझुळू पाण्यात, हळू हळू चाले होडी…शोभून दिसते सर्वांमध्ये, ….व माझी जोडी.
  40. सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
  41. मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं…माझं मन रोज नव्याने,  …. च्याच प्रेमात पडतं.
  42. जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
  43. डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी…माझी झाल्यापासून, जळतात बघा सारी.  
  44. तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.
  45. सोन्याच्या कपावर, चांदीची बशी…समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी. 
  46. प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
  47. एक दोन तीन चार…वर आहे, माझे प्रेम फार.
  48. निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
  49. प्रेमाच्या ओलाव्याने, दुःखं कोरडी झाली…माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली.
  50. चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.
  51. बाहेरच्या जेवणाने पोट बिघडून, व्हायचे आधी जागरण… आता मी खुश, पोटही खुश,  ….निघाली सुगरण.
  52. जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
  53. नंदनवनात आहेत, अमृताचे कलश …माझी आहे, खूपच सालस.
  54. आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, … च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

गृह प्रवेश करतानाचे मराठी उखाणे

  1. नाव घ्या नाव घ्या असा घालू नकावाद…..रावांच नाव घेऊन मिळविन सगळ्यांची दाद.
  2. हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट….च नाव घेतो, आता सोडा माझी वाट.
  3. सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश… रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.
  4. जमले आहेत सगळे, ….. च्या दारात…रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.
  5. सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात…रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट.
  6. सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,…. चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.
  7. आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary…रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry.
  8. रुपेरी सागरावर चंदेरी लाट,…..रावानच नाव घेते सोडा माझी वाट.
  9. उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल…च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल.
  10. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात……- बसले दारात मी जाऊ कशी घरात.
  11. लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल…रावांचे नाव घेते, वाजवून…..च्या घराची बेल.
  12. जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज…. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.
  13. हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट…रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
  14. माहेरी साठवले, मायेचे मोती…. च नाव घेऊन, जोडते नवी नाती.
  15. खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप…रावांच नाव घेऊन, ओलांडते मी माप.
  16. ….. ची लेक झाली, ….. ची सून…च नाव घेते, गृहप्रवेश करून.
  17. शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात… रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात.
  18. नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…रावांचे नाव घेते, ….च्या दारात.
  19. नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले…रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.
  20. गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट…रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
  21. गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,….. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर.
  22. रस्ता अडवायला, जमल्या सगळ्या बहिणी…ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी?
  23. माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,म्हणून …….. रावांची मी सौभाग्यवाती झाले.
  24. नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड…च नाव घेतो, आता तरी वाट सोड.

जेवताना घास भरवण्याचे मराठी उखाणे

  1. मौजमजेने भरला, दिन हा …चा,…रावांना घास देते, गोड गोड …चा.
  2. अभिमान नाही विद्येचा, गर्व नाही रुपाचा…ला भरवितो घास, वरण-भात-तुपाचा.
  3. चकोराला असते, चांदण्याची आस…रावांना देते, …चा घास.
  4. कृष्णाच्या बासरीचा, राधेला लागला ध्यास …ला भरवितो मी, …चा घास.
  5. चांदीच्या ताटात, पक्वान्नांची रास…रावांना देते, …चा घास.
  6. …ला भरवण्यात, येतो आनंद आगळा…घे पटकन नाहीतर, मी फस्त करेन सगळा.
  7. …च्या दिवशी, मस्त जमली पंगत… ला घास भरवून, वाढवतो मी रंगत.
  8. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रुपाचा…रावांना घास भरविते, गोड गोड …चा.
  9. चांदीच्या ताटात, …. चा हलवा…रावांचे नाव घेते, सर्वांना बोलवा.
  10. एक होती चिऊ आणि एक होता काऊ…ला भरवलं तर, मी काय खाऊ? 
  11. अगं अगं …, खिडकीत आला बघ काऊ…घास भरवतो….चा, बोटं नको चाऊ.
  12. आजच्या सोहळ्याचा, थाट केलाय खास…ला भरवतो,…चा घास.
  13. मुंबई ते पुणे, ३ तासांचं आहे अंतर…आधी खाऊन घेतो जरा, नावाचं बघू नंतर.
  14. सुंदर रांगोळ्यांनी आणली, पंगतीला शोभा …ला भरवतोय घास, सर्वांनी बघा.
  15. संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे…च नाव घेऊन, भरवते मी पेढे.
  16. प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी…आज भरवते….ला, गोड गोड बासुंदी.
  17. घरात दरवळला अत्तराचा सुवास… ला भरवते,…..चा घास.
  18. सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास…रावांना देते मी…..चा घास. 
  19. संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड…रावांचे नाव घेते, …. भरवून गोड.
  20. हा दिवस आहे आमच्याकरिता खास, …. ला देतो गुलाबजामचा घास.
  21. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO