विनोदी मराठी उखाणे (Funny Marathi Ukhane | Comedy Marathi Ukhane | Vinodi Marathi Ukhane)
तुम्ही मराठी मजेदार उखाणे शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
Funny Marathi Ukhane | Comedy Marathi Ukhane | Vinodi Marathi Ukhane
- आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
- मला नाही वाटत पाल, कॉक्रोच ची भीती, …….. आहेत माझे कबीर सिंग, आणि मी त्यांची प्रिती.
- लग्नात मागितला हुंडा एक खोक्का….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!
- मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण…. रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण.
- …….. राव आणि माझा, संसार होईल सुखर,जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ते लावतील कुकर.
- चंदनी पानात मुग्ध कळी हसली….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
- खोक्यात खोका टिवी चा खोका,….. माझी मांजर आणि मी तिचा बोका.
- पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात….. रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात.
- हळदीमध्ये पाहुणे पिऊन, झाले आहेत टाईट,……..राव कमी प्या, पोट वाढल आहे, आता जीन्स होईल टाईट.
- कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,.…… राव माझे आहेत फार निस्वार्थी.
- उष्णता खूप वाढली म्ह्णून, ह्यांनी आणली कुल्फी,.…… रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी.
- डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया.
- .…… रावांना आहे, नोकरी सरकारी,म्हणून तर मी घेऊ शकले, उंच भरारी.
- गोड करंजी सपक शेवाई ……होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई.
- टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी….. रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई.
- कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे,.…… रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे.
- बागेत बाग राणीचा बाग…अन् ……रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
- आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची……. म्हणजे जगदंबा.
- आवाज ऐकू येत नाय तर, करा साफ कान,……रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
- चांदीच्या ताटात फणसाचे गरे….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे.
- फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन….. इज माइन.
- तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,…… रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.
- गोव्याहून आणले काजू, गनपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु.
- कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,……. राव आहेत, माझ्यासाठी पागल.
- सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,आमचे हे अजुन कसे नाही आले,गटारात पडले की काय?
- उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,….. राव आहेत, माझे मोठे फॅन.
- जीवन आहे एक अनमोल ठेवा,….. राव आणतात नेहमी सुकामेवा.
- प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,पण ……रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.
- नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.
- नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,….. चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका.
- प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी,…… राव आहेत, एक नंबर चे छपरी.
- महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड् …..रावांना डोळे मारण्याची लई खोड्.
- कपात कप बशीत बशी…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.
- छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा, …..राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा.
- नाव घ्या नाव घ्या करु नका गजर ……रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.
- अंगणात पेरले पोतभर गहू, लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.
- जुईची वेणी जाईचा गजरा,आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.
- बोलणे आहे ह्यांचे, मधापेक्षा गोड, …… राव काढतात नेहमी, मुलींची खोड.
- मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर.
- पाहुणे आहेत वरातीमदे, पिऊन तराट,……च नाव घेऊन, प्रवेश करते घरात.
- पाव शेर रवा पाव शेर खवा….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
- भारताचा कर्णधार, विराट कोहली आहे ऑलराऊंडर,……आहेत डॉक्टर, आणि मी त्यांची कंपाऊंडर.
- एक बाटली दोन ग्लास,माझी बायको फर्स्ट क्लास.
- गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या,…… आहे माझा, हार्दिक पंड्या.
- टिक टिक वाजते डोक्यात …धड धड वाढते ठोक्यात । ….. रावांशी जुळली नाळ … संपेल अंतर झोक्यात.
- व्हीस्की पेक्षा, छान आहे वोडका,……आपल्या लग्नानंतर, भाजी बनवेल मी दोडका.
- ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत….. ला पाहून माझ डोक दुखत.
- केळीचे पान टर टर फाटत …..….. रावाच नाव घेताना कस कस वाटत.
- हजार कमी पडतात, लाखाशिवाय बात नाही,…… रावांचा FB वर फोटो लाईक केल्याशिवाय, पोरी राहत नाही.
- नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून…..अन बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!
- नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद…… राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.
- चहा सोबत लागतो, चांगला मस्का पाव,…..रावांची बाहेर किती लफडी, ते विचारू नका राव.
- ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड …। ….. रावां ना भरवते Icecream चा घास सांगा आहे कि नाही थंड ?
- ताटात होती जिलेबी, त्याला लागली मुंग्यांची रांग,….. रावांचे नाव घेते, तुमच्या नानाची टांग.
- मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,….. च नाव घ्यायला मला नाही आळस्.