निर्जिवांची व्यथा😒 - Nirjivanchi Vyatha

निर्जिवांची व्यथा😒 | Nirjivanchi Vyatha

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Nirjivanchi Vyatha

सततच्या लॉकडाऊनला फक्त,
माणसेच नाही कंटाळली,🙆🏻‍♂️
घरातल्या गोष्टींनीही,
त्यांची व्यथा मांडली।😒

घरातील भांडीकुंडी, त्यांची
रया घालवून बसली,😬
सततच वापराने,
आंतरबाह्य हादरली।🌚

विळी,सुरी मिक्सरच्या हालाची,
कशी करावी गिनती,
जिभेचे चोचले पुरवताना,
झिजली त्यांची पाती।😏

कुकरची शिट्टी देखील
पहिल्या सारखी वाजत नाही,🙁
शिट्टी वाजवण्याचा आनंद
तीही आताशा घेत नाही।😔

डायनिंग टेबलच्या खुर्च्या,
डाफरल्या सगळ्यांवर🤨
ऊठसूट खादाडीसाठी,
येऊन बसतात उरावर ।😡

घरातला फ्रिजदेखील
थंडावा द्यायचे विसरुन गेला.😕
ढिगभर साठवलेल्या गोष्टींमुळे,
त्याचाच जीव गुदमरला।😥

हॉलमधल्या सोफाखुर्च्या,
मनोमन वैतागल्या 😠
सततच्या बसण्याउठण्याने,
सगळ्या बाजूने दबल्या।😫

बेडरूममध्ये जाताच,
पलंगावरची गादी,
उशीच्या कानात कुजबुजली, 😯
वेडेवाकडे बसून झोपून
सगळ्यांनी माझी,
फिगरच बिघडवली।😫

खोल्यांमधील पंखे देखील
थोडे थोडे मंदावले.🤪
सततचे फिरुन फिरुन
त्यांची गतीच हरवून बसले।😇

कपाटातील पुस्तके मात्र
मनापासून सुखावली.🤗
या निमित्ताने का होईना
आपल्यावरची धूळ झटकली😍

निर्जिवांची व्यथा, मला
शब्दाविना समजली.🥲
मला जशी भावली,
तशी तुम्हाला पाठवली।😂😂😂

Share Kavita

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock