Manogat Kapatatlya Pustakache

मनोगत : कपाटातील पुस्तकाचे | Manogat Kapatatlya Pustakache

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Manogat Kapatatlya Pustakache

छान पुस्तके कपाटातली
बोलु लागली आज अचानक
“जीव गुदमरे कपाटात या
कुठे हरवले दर्दी वाचक”?

कपाटातली धुळ झटकण्या
रोज सकाळी येतो नोकर
अक्षरशत्रू असतानाही
मायेने तो फिरवीतो कर

व्हाॕट्सअॕप अन् फेसबुक हे
नव्या पिढीचे नवीन वाचन
कपाटातली पुस्तकशोभा
नव्या युगाची नवीन फॕशन

कपाटामधे बंद राहुनी
विदीर्ण झाले भाव मनाचे
नवी पुस्तके जीर्ण होऊनी
उडून गेले रंग तयांचे

भिलार गावी सुरू जाहली
पुस्तकप्रेमी वाचक चळवळ
जिथे पुस्तका ऐकू येते
पानोपानी रोजच सळसळ

असे असावे वेड शहाणे
जगतामधे गावोगावी
पुस्तक करते हीच प्रार्थना
वाचक चळवळ सक्षम व्हावी

©सुरेश शेठ

मनोगत : कपाटातील पुस्तकाचे हा लेक अवडला असल्यास शेअर करा.

मनोगत : कपाटातील पुस्तकाचे – Manogat Kapatatlya Pustakache – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share मनोगत : कपाटातील पुस्तकाचे

You may also like

3 thoughts on “मनोगत : कपाटातील पुस्तकाचे | Manogat Kapatatlya Pustakache

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO