विविध सण आणि पूजेसाठी खास उखाणे (Marathi Ukhane For Pooja)
उखाण्यांचा इतिहासाविषयी फारसे माहिती नसले तरी, महाराष्ट्रातील प्रत्येक सणाला उखाणे उपलब्ध आहेत. अगदी पूजेपासून संक्रातीपर्यंत. मग सत्यनारायणाची पूजा असो की दिवाळी पूजा, नाव घेण्याची म्हणजेच उखाणा घेण्याची पद्धत असते.
या दिवशी घ्यावयाचे काही खास मराठी उखाणे.
मंगळागौरीसाठी उखाणे
- मंगळागौरी माते नमन करते तुला….रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला.
- पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते….. रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.
- श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली… रावांच्या नावाने मंगळागौर मी पुजली.
- हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी….. रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.
- श्रावण महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट… रावांचं नाव घ्यायला मी कशाला बघू वाट.
- शिंपल्यात सापडले माणिक मोती….रावांच्या जीवनात झाले मी सारथी.
- मंगळागौरीचे खेळ खेळू, फुगड्या, कोंबडा, पिंगा.. रावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा.
- पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात….. रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात.
- स्वर्गीय नंदनवनात आहेत सोन्याच्या केळी.. रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या वेळी.
- सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी……रावांचे नाव घेते …… च्यावेळी.
- जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले….. रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले.
- मोत्याची माळ, सोन्याचा साज…… रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज.
- यमुनेच्या काठी राधाकृष्णेचा खेळ…. चे नाव घेते आज मंगळागौरीची वेळ.
- आंब्याच्या वनराईत कोळिळेचे गुंजन… चे नाव घेऊन करते मी मंगळागौरीचे पूजन.
- मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती….च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती.
- एमेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते….. नावाने मंगळागौर सजवते.
- निलवर्ण आकाशात चमकतो शशी….नाव घेते मंगळागौरी पूजनाच्या दिवशी.
- सासर आहे छान, सासू आहे होशी…. चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
- सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे….. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.
- मंगळागौरीसाठी जमवली सोळा प्रकारची पत्री …..रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या रात्री.
- मंगळागौरीच्या दिनी जमला, मैत्रिणींचा मेळा…रावांचे नाव घेतले, आता मनसोक्त खेळा.
- पूजते मंगळागौरीला, खेळ खेळते नवे नवे…राव पती म्हणून, जन्मोजन्मी हवे हवे.
- श्रावणातल्या मंगळवारी, पूजते मंगळागौर…रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर.
- मंगळागौरीला खेळते, खेळ मी नवे…रावांच्या साथीने, सुखी जीवन मला हवे.
हळदीकुंकवासाठी उखाणे
- सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
- कान भरण्यात, बायका आहेत हौशी…..रावांचा नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
- लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,……….. च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
- साड्या घातल्या आहेत, सर्वानी छान,….रावंच नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
- नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी…..च्या जीवनात….ही गृहिणी.
- हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,….रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.
- अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो …..नी माझी जोडी.
- हळदी कुंकूसाठी, जमल्या साऱ्या बायका,….रावांचे नाव घेते, सर्वानी ऐका.
- वडिलांची माया आणि आईची कुशी,….रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
- हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,….मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
- हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,….रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.
- आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,…चं नाव घेते कुंकू लावून.
- सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास,….रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.
- चांदीच्या ताटात गाजराचा हलवा,….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
- जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,…. रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.
- चांदीचे जोडवे पतीची खूण,…. रावांचे नाव घेते …. ची सून.
- भारत देश स्वतंत्र झाला, १५ ऑगस्टच्या दिवशी,…. रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.
- हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,….रावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण.
- दिवाळी होती म्हणून, बनवले करंजीचे सारण,…. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंचे कारण.
- दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,…..रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
- सर्व दागिन्यात, श्रेष्ठ काळे मणी,…. राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी.
मकरसंक्रांतीसाठी उखाणे
- रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा
- तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत
- संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला…रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला
- संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा…रावांचे नाव घेऊन, आशिर्वाद मागते सौभाग्याचा
- जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले…रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले
- सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी
- सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट
- बारीक मणी घरभर पसरले…रावांसाठी मी माहेर विसरले
- उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव
- आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा
- मोत्याची माळ, सोन्याचा साज….रावांचे नाव घेते, मकर संक्रांंतीचा सण आहे आज
- संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी
- संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात….रावांचे नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात
- गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी….रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी
- पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे…रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे
- कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचा ठसा…रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा
- सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास
- महिन्यात असते कधी पुनव कधी अवस….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांतीचा दिवस
- सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह
सत्यनारायण पूजेसाठी उखाणे
- कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
- यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
- गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
- वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
- बारीक मणी घरभर पसरले,…… साठी माहेर विसरले.
- पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
- लग्नात लागतात हार आणि तुरे,…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
- चंदनी पानात मुग्ध कळी हसली,…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
- रुपेरी सागरावर चंदेरी लाट,…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
- परसात अंगण, अंगणात तुळस,…. नाव घ्यायचा मला नाही आळस.
- रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,…. च्या साथीने आदर्श संसार करीन.
- हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
- इंग्रजीत म्हणतात मून,…. चंं नाव घेते …. ची सून.
- सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
- आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,…. चं नाव घेते कुंकू लावून.
- चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
- चांदीचे जोडवे पतीची खूण,…. रावांचे नाव घेते …. ची सून.
- आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
- आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर, याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
- बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
- वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
- अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!