पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
सरली म्हणतात तरी..
दारातल्या विस्कटल्या रांगोळीत..
थोडीशी अजून उरली आहे दिवाळी
लाडू चकलीच्या अर्ध्या भरल्या डब्यात
आणखी खमंग मुरली आहे दिवाळी…
व्हरांड्यातल्या फिकटल्या कंदिलात
अजूनही हलकेच झुलते आहे दिवाळी
दारात तेवणा-या पणतीच्या ज्योतीत
अजूनही प्रकाश घेऊन डुलते आहे दिवाळी…
घडी मोडल्या कपड्यांच्या पहिल्या सुरकुतीत
अजूनही नवी कोरी चुरली आहे दिवाळी
लक्ष लक्ष ज्योती उजळून
अजूनही मनात मी भरली आहे दिवाळी…
सरली म्हणतात तरी…
अजूनही उरली आहे दिवाळी
अजूनही उरली आहे दिवाळी…
4 thoughts on “दिवाळी | Diwali Kavita”