पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
त्या दिवशी अचानक आम्हा तीन मैत्रिणीचं गेट टुगेदर झालं. कऱ्हाड कन्याशाळेतील आम्ही कितीतरी जणी पुण्यात स्थायिक झालो होतो. आम्ही नियमितपणे एकत्र भेटतो. आज मात्र फक्त पुष्पा , एसबी आणि मी.
नोव्हेंबरचा पहिला आठवडा. दिवाळीच्या चकली, कडबोळी, आणि चिवड्याबरोबर खमंग गप्पा दिवसभर रंगल्या. संपल्या मात्र नाहीत, संपणाऱ्या हि नव्हत्या. अंथरुणावरच बेडशीट नीट करता करताच पुष्पान दोन तीन वह्या पुढं आणून टाकल्या.
आम्ही तिघी हि संगीताच्या वेड्या. पुष्पाकडे गाण्याचा खजिनाच आहे. त्या दिवशी हे गाणं म्हण, ते गाणं म्हण असा करत आम्ही कितीतरी जुन्या गाण्यांना उजाळा दिला. वयाच्या ७८व्या वर्षीही त्यांच्या आवाजात कमालीचा गोडवा होता. ‘गोड तुझी बासरी‘, ‘मधुमागसी‘, ‘विसरशील खास मला‘, ‘कशी जाऊ मी वृंदावना‘ अशी गाणी गाऊन तो दिवस सार्थकी झाला. ‘सखी मंद झाल्या तारका‘ हे गाणं पुष्पा आणि एसबीनं गायलं.
खिडकीतून बाहेर बघितलं, तर चंद्रकोर आणि चांदणंही फिकट होत चाललं होतं. घड्याळ ठोके देण्याचं काम करत होतं. पण आम्ही भूतकाळात शिरलो होतो. चारचे ठोके पडले आणि आम्ही भानावर आलो.
सकाळी जड पावलांनी एकमेकींचा निरोप घेऊन घरी परतलो. त्या दिवशीची ती मंतरलेली रात्र मात्र कायमची आठवणीत राहिली.
-©पुष्पा पेंढरकर
आम्ही तिघी ! – Amhi Tighi ही कथा आवडली असल्यास शेअर करा.
आम्ही तिघी ! – Amhi Tighi – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
5 thoughts on “आम्ही तिघी | Amhi Tighi”