पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा।
श्रेय ज्याचे त्यास दयावे; एवढे लक्षात ठेवा।।
ती पूर्वजांची थोरवी,त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या; एवढे लक्षात ठेवा।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घयावे सदा।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा।।
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा।।
विश्वास ठेवावाच लागे; व्यवहार चाले त्यावर।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा।।
दुपटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले।
तो गुरुचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा।।
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी।
त्याने स्वःताला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा।।
-©️विंदा करंदीकर
2 thoughts on “श्रेय ज्याचे त्यास दयावे | Shrey Jyache Tyas Dyave”