पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Sometimes in life
प्रखर उन्हाचे चटके सोशीत
जीवनपथ काट्यातून तुडवित
कष्ट संपले स्वप्न बहरले
घरात माझ्या गोकुळ नांदत
अकस्मात आयुष्यात कधी कधी
चालून येते अमोल संधी
गत जन्मीची ओळख सांगत
कृष्णाकाठी सखी मज भेटत
ब्रम्हचैतन्य गुरू गोंदवलेकर
मज भेटविले केले निर्भर
नामामृत चाखिता तृप्त मी
सदगुरूचरणी लीन मी अविरत
-©पुष्पा पेंढरकर
31।3।21
16 thoughts on “आयुष्यात कधी कधी | Sometimes in life”