पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Corona Naavacha Bagulbuva
या मोठ्यांचं मुळी काही कळतंच नाही
बाप्पा मला मोठं कधी व्हायचंच नाही
कोरोना कोरोना म्हणजे काय नाही करायचं
विचारल्यावर म्हणतात तुला नाही कळायचं
लवकर उठून बसतात कामाला बाबा नि आई
दार मी ठोकलं तरी उघडतच नाहीत
कामाच्या मावशी येतच नाहीत
आजीला खेळायला वेळच नाही
एकट्यानेच खेळायचं कुणी बोलायला नाही
तीच तीच खेळणी बघून कंटाळा येई
बाप्पाच्या देवळात आजी जातच नाही
दुकान बंद म्हणून खाऊ आणत नाही
आजोबा बाहेर आता पडतच नाहीत
घसरगुंडी झोपाळ्यावर कुणीच नेत नाही
जून मध्ये शाळेला तू जाणार ना रे बाबा
खूप मिळतील मित्र आणि खेळणी तुला
कसलं काय आई सारं विसरुन गेली
शाळा नाहीं न बिळा नाही मजाच संपली
कोरोनाच्या बागुलबुवा याद ठेव पक्की
स्पायडर मॅन ढिशूम करून एकच देईल बुक्की
-©पुष्पा पेंढरकर
09/04/2021
2 thoughts on “कोरोना नावाचा बागुलबुवा | Corona Naavacha Bagulbuva”