Eka Coronayodhache Balidan

एका करोनायोद्धेचे बलिदान | Sacrifice of a Corona Warrior

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

एका करोनायोद्धेचे बलिदान – Eka Coronayodhache Balidan

Eka Coronayodhache Balidan

सध्या बॉलिवुड, कंगना, स्वरा भास्कर, उर्मिला, जया, हेमा व संज्या रौत या विषयांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला गुंगवुन ठेवल जात आहे.

करोनाच्या प्रश्नावरुन जनतेच लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी व सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी हे सर्व विषय येनकेन प्रकारे उकरुन काढले जात आहेत व सतत फ़ुंकर मारुन जळत ठेवले जात आहेत. मुख्यमंत्री आपल्या बंगल्याच्या चार भिंतीत सुरक्षीत बसुन इतरांना लढो लढो म्हणत नेतृत्व करीत आहेत.  आपले भाट जी स्तुतीसुमन उधळत आहेत त्यामुळे मी किती महान आहे या भ्रमात मशगुल आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या खाण्यापिण्याची काळजी भाभी घेत आहेत. त्यांच्या हातचे पापड जनतेपर्यंत पोहचतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या हातचे पापड खावुन जनतेच करोनापासुन सरंक्षण होणार तर नाही. त्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडत आहेत तेव्हढे पुरे.

मग ग्राऊंड लेव्हलला कोण लढते आहे? जीवाची बाजी कोण लावते आहे?

संघ परिवारातील कार्यकर्ते लढत आहेत. अनेक युवक व युवती समाजात या कठीण काळात जीवाची पर्वा न करता योजनाबद्ध रीत्या विविध प्रकारे सेवा बजावत आहेत. पण सरकारला त्यांच्या कार्याची दखल घेण्याची लाज वाटते, त्यांचे कौतुक करणे राहिले बाजुला पण त्यांच्यावर संकट आले तर या मुर्दाड सरकारला ना त्याची खंत आहे ना खेद.  उपरवाला सब देख रहा है.

हा सर्व राग उफ़ाळुन येण्या मागच कारण एका करोनायोद्धेचा या लढाईत झालेला क्लेशदायक अंत.

गौतमी जोगळेकर, महाड, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. वय वर्षे वीस.

संघाच्या संस्कारात मोठी झालेली कन्या. उत्साही, सळसळत्या रक्ताची, समाजकार्यात हिरारीने भाग घेणारी.

करोनाची साथ जशी अक्राळविक्राळ स्वरुप धारण करायला लागली तशी घराबाहेर पडुन थेट लढाईत उतरली. जनकल्याण रक्तपेढी, महाड तर्फ़े रुग्णांसाठी रक्तदानाची अनेक शिबीर तीने आयोजित केली. गावोगावी, गल्लोगल्ली फ़िरुन बायाबापड्‍यांची आरोग्य तपासणी करणे या मोहिमेतही तीने पुढाकार घेतला. गेल्या चार महिन्यात तीने या कामांमध्ये स्वताःला झोकुन दिले होते.

करोना मोठा विचित्र व्हायरस आहे. कोणाला तो काय करेल याच गणित उलगडत नाही, शंभर वर्षाच्या आजी यातुन बर्‍या होतात तर एखादा धडधाकट जवान यातुन सावरु शकत नाही व त्याचा बळी जातो.

गौतमीला या दृष्ट विषाणुने बाधल. तीन दिवसाच्या आधी उर्जेने ओसंडणार्‍या गौतमीला एक दिवस थोडा थकवा जाणवला, अंगात कणकण जाणवली. तीने आपली चाचणी करुन घेतली. निष्कर्ष: करोना पॉझीटीव्ह.

अनेक जण बाधीत होतात व बरे होतात. पण या विषाणुचा गौतमीवर काय राग होता काय माहीत. तीन दिवसातच गौतमीची तब्येत ढासळली व तीचा अंत झाला.

आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणार्‍या डॉक्टर अजय जोगळेकरांना व त्यांच्या पत्नीला आपल्या लाडक्या लेकीला अचानक सोडुन जाताना बघाव लागल. किती वेदना झाल्या असतील त्या बापाला व त्या मातेला? पण त्यांनी स्वताःला सावरलय. कारण त्यांची लाडकी कन्या या करोनाशी लढली होती. आपल सर्वस्व पणाला लावुन ती या विषाणुपासुन समाजाला वाचवायला लढली होती. तीला वीरमरण आल होत.

तीची ती प्रसन्न मुद्रा, तीचा हसरा चेहरा बघीतला की डोळे पाणवतात.

बाळा तुला मनःपुर्वक श्रद्धांजली.

एक आदर्श समोर ठेवुन तु गेलीस.

तु कधीच आमच्या विस्मृतीत जाणार नाहीस. 

करोनाच्या युद्धात रस्त्यावर उतरुन समाजसेवा करणार्‍या सर्व  युवक युवतींना मानाचा मुजरा.

©️सुनील बक्षी

एका करोनायोद्धेचे बलिदान – Eka Coronayodhache Balidan Source
Eka Coronayodhache Balidan

एका करोनायोद्धेचे बलिदान – Eka Coronayodhache Balidan – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

एका करोनायोद्धेचे बलिदान – Eka Coronayodhache Balidan हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

Share Eka Coronayodhache Balidan

You may also like

7 thoughts on “एका करोनायोद्धेचे बलिदान | Sacrifice of a Corona Warrior

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.