पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Earth Day 2021
नवे साल संदेश नवा
नव तरु लावा जुनीही जगवा
विशाल तरुवर खरेच ऋषीवर
छाया शीतल देती जीवा
हरित वसन अन लता फुलांनी
वसुंधरेला सजवा नटवा
प्राणवायू लाभेलच विश्वा
कोरोनाला सहजची हटवा
वनौषधींचे अमोल ते धन
सकल प्राणीमात्रा संजीवन
सुजलाम सुफलाम ही वसुंधरा
क्षमाच केवळ देईल आधारा
मन्त्र एकची गाऊ एक गीत
चला करूया निर्भय भारत
-©पुष्पा पेंढरकर
२२/०४/21
वसुंधरा दिन पर्यावरणीय कार्यक्रमांना आधार देणारा पाया आहे. गेल्या 45 वर्षांपासून दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन‘ म्हणून जगभर साजरा केला जातो.
One thought on “वसुंधरा दिन | Earth Day 2021”