पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Deprivation
चिता आणि चिंता यात जास्त दाहक चिंताच.ती क्षणा क्षणाला जाळत रहाते. तिला दूर कसे पळवायचे हे माणसाच्या मनावर आहे.
आता मला सांगा, कोरोनाचा कहर झाला. काळजी हे त्यावर औषध आहे का? काळजी करत बसण्यापेक्षा कार्यरत रहा, काही छंद जोपासा, तर काळजाला वेळच कुठे राहील?
गेल्यावर्षी कोरोना काळात मी रोज अथर्वशीर्ष आवर्तन केले, दासबोध वाचन होतंच, काही वाचन प्रार्थना लिखाण खूप केलं, मास्क शिवून पहिला, ईतर शिवण,विणकाम तेही केले, घरच्यांची काळजी करायला वेळच नाही उरला.
सई बाईंच्या निधनानंतर महिन्याच्या आतच शिवप्रभूंनी बलाढ्य शत्रू लोळवाला. प्रजाजन, वृद्ध माता, छोटे अर्भक कुठे नसेल जीव गुंतला? प्रचंड चिंता होत्या, पण हा धैर्यमेरू डगमगला नाही.
निर्जन वनवासात तुकाराम वृक्षवल्ली, पशुपक्षी यांच्या सहवासात आंनदाचे डोही डुंबत राहिले, साऱ्या चिंता फेकून देऊन नयनी गंगा हृदयी काशी, का चिंता करिशी असं आधुनिक वाल्मिकी सांगून गेले.
पण एवढे असून सुद्धा जगात चिंतातुर जंतू अनेक ठिकाणी विखुरलेले आहेतच. हे जंतू थेट ईश्वराच्या उधळपट्टीलाच आव्हान करतात, ‘कशाला इतका पाऊस पाडतोस आणि पाणी वाया घालवतोस आणि इतक्या तारका तरी आकाशात कशाला हव्यात’? अशी अनेक उदाहरणे कवी गोविंदाग्रजांनी ‘ चिंतातुर जंतु’ या त्यांच्या काव्यात मांडली आहेत.
भूतकाळ विसरा, भविष्याची चिंता नको, आजचा वर्तमान समाधानात घालवा असं ब्राम्हचैतन्य पुनःपुन्हा सांगतात. आणि मला सुचलं ‘ निज कर्तव्या नकोस विसरू, नकोस करू तू चिंता खेळ पाहतो कौतुके तुज रक्षित जगत नियंता’.
-©पुष्पा पेंढरकर
विवंचना | Deprivation हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
विवंचना | Deprivation – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
4 thoughts on “विवंचना | Deprivation”