पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Father
जन्मदात्या माऊलीचा
जगी महिमा महान
परि मातृत्व देणाऱ्या
बापालाही द्यावा मान
बाळा जन्म देण्या माता
झेली यातना अपार
बापाच्याही जीवाला तो
लागे तेव्हढाच घोर
ईजा होता अर्भकाला
कळा लागती मातेला
स्वास्थ्यासाठी बापाचाही
जीव लागे टांगणीला
बालकाच्या संगोपना
झीज सोसे ती स्वतःला
स्थैर्य आणण्या बाळाला
बाप पळवी स्वतःला
लोकसंस्कृतीला सदा
बाप कठोर भासला
परि मातेसम मृदू
असे हृदय बापाला
जागतिक पितृदिनाच्या निमित्ताने…
©️प्रविण शांताराम, पनवेल, रायगड
7 thoughts on “बाप | Father”