Take a Step Forward

टाक पाऊल पुढे | Take a Step Forward

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Take a Step Forward

लिहायला येईल असं वाटत नाही, पण तुम्ही सर्वांनी दिलासा दिला, ” टाक पाऊल पुढे”. वार्धक्यात पाऊल आधीच मंद पडत आहे.

पाऊल पुढे टाकायला धाडस हवं,
निश्चय हवा. ” पाऊल मागे नाहीच घेणार, येऊ देत अडचणींचे डोंगर
त्यावर मी मातच करीन, ध्येय गाठेन.”

पुराण, इतिहास असंख्य दाखले दाखवतात. चक्र व्यूहात जाणून बुजून शिरलेला अभिमन्यू, तपश्चर्येला बसलेला ध्रुव, शंकराच्या लाभासाठी तप करणारी उमा! नाना संकटं सोसली, पण ध्येय तर गाठलंच.
झाशीच्या तटावरून घोडा फेकतांना “टाक पाऊल पुढे” असंच राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या असतील.

मदनलाल, भगतसिंह, रास बिहारी घोष, मंगल पांडे सारे क्रांतिकारक हा एकच मंत्र जगले आणि अमर झाले.स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत यांच्या कष्टाला शब्द अपुरे पडतील, तरीही पाऊल पुढे ध्येयाकडे.

असंख्य अडचणी सोसून छ. शिवरायांचे पाऊल पुढेच पडत होते.

लेखाच्या अंती आनंदीबाई जोशी समोर उभ्या राहिल्या. म्हणाल्या
” मी अपार कष्ट आणि असाध्य रोग साथीला घेऊन अमेरिकेत
डॉक्टर झाले ना? दुर्दैवाने मला देशवासीयांची सेवा नाही करता आली. पण देशातील अनेक स्त्री डॉक्टर मला स्मरत असतील!”

धाडसाने पाऊल पुढे टाका, यश तुमचेच आहे.

पुष्पा पेंढरकर
10।08।22

टाक पाऊल पुढे | Take a Step Forward हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

टाक पाऊल पुढे | Take a Step Forward – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share टाक पाऊल पुढे | Take a Step Forward

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO