पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Speaking in the womb
जाणून सर्व काही,अपराध मीच केला
कन्या, सून उदरी मी त्यागिले न तिजला
नच मानिले कुणाचे घरदार वैरी झाले
पहिले अपत्य तरीही कौतुक कुणी न केले
सर्व काही सांग आई सांग दुःख मनातले
तू मला अन मी तुला गर्भात मजला उमगले
नाते तुझे नि माझे हा गोफ रेशमाचा
प्रभुनेच गुंफीला जो नाही तुटावयाचा
हर क्षेत्री कार्य करण्या नारी असे समर्थ
अबला म्हणुनी तिजला हिणवू नकाच व्यर्थ
किती स्वप्नं घेऊनिया आले तुझ्या मि पोटी
कुल भूषविन आपुले मनी ठेव खूण गाठी
-©पुष्पा पेंढरकर
One thought on “बोलते गर्भात मी | Speaking in the womb”