पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Ephemeral
हा लेखाचा विषय बघितला आणि पावसाळ्यात येणारे अल्पायुषी किडे आठवले दिव्याच्या प्रकाशाला भुलून त्याच्याशी खेळून काही क्षणात त्यांचे जीवन संपते
जीवन क्षणभंगुर आहे पण मानवाला परमेश्वराने बुद्धीची अमोल देणगी दिली आहे तिचा उपयोग करून जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा माणसाला क्षण जिंकता यावा प्रत्येक क्षणाचे सोने व्हावे
आजकाल आत्महत्या प्रचंड वाढल्या आहेत अशावेळी मंगेश पाडगावकर यांची कविता आठवते तुम्हीच सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत कि गाणी म्हणत
संकटं तर येतातच त्यांना सामोरं जायचंच मग रडत का? हसतमुखाने जा ना.
बोलकीच उदाहरणे सांगते
इंग्रजांच्या तोफांनी आपली प्राणप्रिय जनता जळताना पहिली अणि झाशीच्या राणीने नैराश्याने आत्महत्या करायचा निर्णय घेतला पण एका जुन्या सेवकाने तिला त्यापासून परावृत्त केलं तो म्हणाला ” अशा मरणाने तुम्ही सुटाल पण शत्रूंशी लढता लढता वीरमरण आलं तर तुम्ही अमर व्हाल ” हा क्षण मोलाचा होता तटावरून घोडा फेकून तिने इंग्रजांशी निकराचा लढा दिला, ज्याचे इंग्रजांनीही कौतुक केले, राणी इतिहासात अमर झाली
थोर उद्योजक श्री विट्ठल कामत,एक वेळ आत्महत्येला प्रवृत्त झाले ( इडली आरकेड आणि मी ) त्यासाठी कामत घराच्या ग्यालरी च्या कट्टयावर चढलेही आता खाली उडी मारणार त्याच क्षणी त्यांना जीवनाचं मोल प्रचंड आहे याचा साक्षात्कार झाला दोन शिड्या एकावर एक बांधून उंच इमारती च्या भिंतीवर एक इसम काम करीत होता एका हाती रंगाचा डबा दुसऱ्या हाती ब्रश जीवाचा थरकाप उडवणारे होतं सारं आणि काम करताना तोंडानं तो मजेत शीळ घालत होता
इतकं कठीण जीवन जगतानाही तो मजेत असतो, मी का कंटाळलो जीवनाला? कामतांनी मनालाच प्रश्न विचारला
आज अनेकांचे अन्नदाते म्हणून जगात त्यांची कीर्ती आहे क्षण जिंकला त्यांनी
म्हणून म्हणते असू दे जीवन हे क्षणभंगुर सत्कार्याने ते होईल अमर.
©पुष्पा पेंढरकर
क्षणभंगुर | Ephemeral हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
क्षणभंगुर | Ephemeral – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
14 thoughts on “क्षणभंगुर | Ephemeral”