पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Hands (Palms)
कर अग्रावर वसते लक्ष्मी सरस्वती अन कर मध्यावर
करतली करितो गोविंद निवासा
दर्शन त्यांचे अती शुभंकर
बलशाली करी शस्त्र शोभते
खल आसुरांचे वध करण्या
नकोच कांचन नकोत मोती
काच कंकण भूषण नारी जना
विश्वासाने करी कर दिला,
गुंफण त्याची घट्ट असावी
ब्रम्हयाने त्या गाठ बांधली
सैल कधी ना ती व्हावी
देऊनि निज कर रथ चक्राला कैकई देते आधारा
विजयी दशरथ आनंदाने
देतो तिजला दोन वरा
प्रसंग येता म्हणे पतीला
भरतालागी द्या सिंहासन
वाल्मिक सांगे हे रामायण
©पुष्पा पेंढरकर