पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Naive devotion – भोळी भक्ती
टाळ मृदुंग नि नामगजरही
दुरूनि ये कानी
ईथे राबतो, जरी शेतावर
मन माझे विठ्ठल चरणी ||1||
भल्या पहाटे मोर गातसे,
अधरि माझ्या अभंग रंगे
नेत्रि मूर्त सावळी ||2||
यज्ञ याग जप मला न कळते
यथासांग पूजा
बहरल्या रानात बघतो
माय बाप विठू राजा ||3||
भावेल तुजला श्री हरी
संकटी धावून येसी
राबसी भक्ता घरी ||4||
सर्वार्थाने प्राण सखा तू
जरी ना घडते वारी
तुझ्या स्वरूपी दोन रांगती
बाळे माझ्या घरी ||5||
©पुष्पा पेंढरकर
4 thoughts on “भोळी भक्ती | Naive devotion”