पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Female Vampire
नागपूर पासून चाळीस पन्नास किलोमीटरवर एक गाव आहे. व्याहाड नाव आहे गावाचं. त्या गावाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत देव देवता पिशाच संत वगैरेंच्या तेथे दमडाची महाराज नावाचे साक्षात्कारी संत होऊन गेले आहेत तसेच नदीत एक छोटे मंदिर आहे महाकालीचे जुन्या काळी कुणा गरिबाकडे काही कार्यक्रम असला तर मंदिरात देवीसमोर सामानांच्या यादींची चिट्ठी ठेवत. ते सर्व सामान दुसऱ्या दिवशी तेथे तयार असायचे अगदी तुपाचे पीपे सुद्धा. पण भांडे मात्र जसेच्या तसे परत आणुन ठेवावे लागत होते.
खूप लोकांनी त्यातही भ्रष्टाचार केला वस्तू गायब केल्या मग येणेच बंद झाले असो आता तर गावाची शहरीकरण झाले आहे ते गाव आमच्या काकूंचे माहेर आहे त्यांच्या वडिलांची किराणामाल आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकान आहे त्यांना आम्ही अण्णाजी म्हणत असू ते बाजाराच्या दिवशी शेजारच्या गावोगावी बैलबंडी ने जाऊन दुकान थाटाचे व रात्री परत यायचे अंदाजे 1980 सालची ही घटना आहे. ते संपूर्ण गावच दमडा जी महाराजांचे भक्त होते तसेही जुन्या लोकांना बरेच टोटके माहित असायचे कारण त्या काळी ओसाड जमिनी शेतीवाडी नदीनाल्यांचा प्रवास खेड्यातली वस्ती. बऱ्याच खेड्यात वीजही नव्हती तेव्हा. त्यामुळे त्यांचा अशा अतींद्रिय शक्ती शी नेहमीच सामना व्हायचा.
नदीच्या काठावर एका पिशाचीनी ची वस्ती होती.ती बऱ्याच लोकांना झपाटलेली होती.नदीतुन जाणाऱ्यांना त्रास द्यायची. एकदा अण्णाजी नेहमीप्रमाणे नदी ओलांडून शेजारच्या गावात गेले दिवसभर दुकान लावले आणि रात्रीला थोडे उशिराच बैल बंडी ने घरी यायला निघाले तशीही ती त्यांची नेहमीचीच वाट होती. जशी त्यांनी नदीत बैलबंडी उतरविली त्यांना बंडीत कोणीतरी बसल्याचा भास झाला. ते मागे वळून बघणार तोच आवाज आला मागे पाहू नको. ते गप्प बसले. पण बैलांच्या डोक्यावरच्या बाशिंगा त असलेल्या आरशात त्यांना मागचे दिसत होते. एक लभानीन बंडीत बसलेली होती हातभर बांगड्या मोठे कुंकू वगैरे तिने लावले होते. त्यांनी आवाज दिला “खाली उतर” ती म्हणाली नाही उतरणार. ते पुन्हा पुन्हा तेच म्हणत राहिले खाली उतर ,खाली उतर .तसतसा तिचा आकार मोठा होत होता.
आणि आवाजही भेसूर होत होता. गाव जवळ आलेलं होतं त्यांनी हिंमत करुन बैलबंडी थांबविली आणि झटक्यात मागे फिरून तिचे केस पकडले. तशी ती जोरात किंचाळली आणि गयावया करायला लागले केस सोड केस सोड. पण हे सुध्दा पक्के त्यांनी वचन घेतलं, पुन्हा कधी कोणत्या वाटसरूला पकडायचं नाही. तरच सोडतो. तिने वचन दिले. यांनी केस सोडले तर अशी ती उठून पळाली. पुन्हा कुणाला कधी दिसली नाही.
असं म्हणतात की स्त्री पिशाच याची शक्ती त्यांच्या केसात असते. कुणाला जर ते केस हाती लागले तर ते पिशाच कायम त्यांचं गुलाम बनून राहते म्हणून हे जाणते लोक वगैरे भूतांचे केस जवळ बाळगतात. पण शेवटी त्यांचा परिणामही वाईट होतो. अण्णाजी जेव्हा नागपूरला आमच्या घरी येत, तेव्हा या घडलेल्या घटना सांगत असत.
-©डॉ.सुलेखा अ.सरोदे
नागपूर
स्त्री पिशाच्च | Female Vampire हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
स्त्री पिशाच्च | Female Vampire – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.