Gaavch Ghar

गावचं घर कथा 1 | Gaavch Ghar Katha 1

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

माझ्या आईचं माहेर चौल म्हणजे अलिबागच्या पुढे एक तास. गावं तस लहान आणि खुप आकर्षक आहे. खुप पर्यटक उन्हाळी सुट्टी मध्ये पर्यटनाला आवर्जून येतात. अश्या गावात माझ्या आजीचं घर. शेणाने सारवलेल्या भिंती, बाहेरची ओटी, ओटीवर ठेवलेलं बाजल आणि मध्ये बांधलेला झोपाळा. एक हॉल आणि kitchen आणि मग पडवी.

एकदा आई आणि मी सुट्टीत आजी कडे राहायला गेलो. गेलो तेव्हा पासून विचित्र घटना घडत होत्या पण दुर्लक्षित केल्या गेल्या. बाहेरच्या खोलीत मोठा रामाचा फोटो लावलेला होता कारण माझी आजी राम भक्त. तर घर झाडताना अचानक मोठा आवाज झाला बघितलं तर रामाच्या फोटो फ्रेम ला तडा गेला होता मग आम्ही तो बाजूला काढून ठेवला. रात्री आजी खाटेवर झोपायची आणि आम्ही खाटेखाली सतरंजी टाकून झोपायचो.

तर मध्यरात्री अचानक आमच्या ओटीवर मांजरी येऊन रडत होत्या त्या मुळे मला जाग आली आणि बाजूला आजी च्या खाटेवर मला कोणी तरी झोपलंय असा भास झाला. मी घाबरून आईला चिकटून झोपले. काही वेळाने अचानक खाटेवर पाय वर खाली केल्याचा आवाज येऊ लागला आणि मी बघितलं तर आजीच्या अंगावर ची चादर वर खाली होत होती मला वाटलं आजी चुळबुळ करत असेल म्हणून मी आईला उठवलं तर आईने बाजूला असलेली टॉर्च मारली आणि बघितलं तर आजी गाढ झोपली होती. आमच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला.

परत झोपलो तर थोडया वेळाने खाट आणि आम्ही ह्यांच्या मध्ये एक पुरुष भर उंचीची आकृती अंगाला घोंगड लपेटून उभी दिसली म्हणून घाबरून टॉर्च मारली तर तिथे कोणीही नव्हतं. ह्या सगळ्या प्रकारामुळे आम्ही म्हणजे आई आणि मी उठलो आणि kitchen मध्ये झोपलो. आणि नंतर जाग आली ती सकाळीच आता तो झालेला प्रकार हा भास होता की काही अकल्पित हे सांगता येणं कठीण आहे पण आजही ते आठवलं की अंगावर काटा येतो.

-©दर्शना पा गोखले

गावचं घर कथा 1- Gaavch Ghar Katha 1 ही कथा आवडली असल्यास शेअर करा.

गावचं घर कथा 1- Gaavch Ghar Katha 1 – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share गावचं घर कथा 1- Gaavch Ghar Katha 1

You may also like

3 thoughts on “गावचं घर कथा 1 | Gaavch Ghar Katha 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock