पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Sesame seeds
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !
” तिळा , तिळा , कसली रे गडबड ? ”
” थांबायला वेळ नाही .
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड !”
” ऐक तर जरा , पहा तर खरा ,
कणभर तिळाचा मणभर नखरा ! ”
“बघा तरी थाट ! सोडा माझी वाट !”
” बघू या गंमत , करू या जंमत !
चला रे जाऊ याच्याबरोबर .”
तीळ चालला भराभर . वाटेत लागले ताईचे घर .
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
” घाल मला पाकात, हलवा कर झोकात.”
ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत .
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा गेले घाबरून!
पण तीळ पाहा कसा ?
हाय नाही , हुय नाही , हासे फसफसा !
पाकाने खुलतोय , काट्याने फुलतोय !
अरे , पण हे काय ? तीळ कुठे गेला ?
काटेरी , पांढरा हलवा कुठून आला ?
” वाटाण्या , फुटाण्या , शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत ? कणभर तिळाची मणभर करामत !
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला ! “
(१९७८-७९ इ.२ री बालभारती कवीचे नाव -अज्ञात)
कणभर तीळ | Sesame seeds हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
कणभर तीळ | Sesame seeds – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.