Wealth/Property
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Wealth/Property

जमीन जुमला घर दार

वाटणी सगळी पार पडली

सगळेच एकदम खुश होते

वाद ठिणगी नाही पडली

तीन बांधव अन् एक बहिण

सगळेच आज एकत्र भेटले

आपापसातच हिस्से सगळे

समसमान वाटून घेतले

एका ठिकाणी जरा मात्र

गाडी थोडी अडकून पडली

आई बाबांचं काय करायचं

चिंता सगळ्यांचीच वाढली

धाकट्याला दोघं झेपत नव्हती

मधल्याची कामंच संपत नव्हती

लेकीचा तर ह्याच्याशी संबंध नव्हता

थोरला लवकरच बाहेर जाणार होता

आईसाठी मग वेगळा हिस्सा काढला

आईला घ्यायला धाकटा लगेच धावला

बाबांच्या हिश्श्याची काढली चार शेते

लेक म्हणाली मीच बाबांना घरी नेते

थोरला मग जरा कोपऱ्यात गेला

म्हातारा म्हातारीच्या जवळ बसला

आई, तुला ही वाटणी पसंत आहे का?

अजून काही वाटायचं राहिलंय का?

ओल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे बघितलं

अन् जड आवाजात त्याला सांगितलं

राजा, सगळीच हिस्से वाटणी तुम्ही केली

एक दौलत मात्र आमच्यापाशीच राहिली

सगळ्यांनीच आपले कान टवकारले

आईकडे अजून काय बरं बाकी राहिले?

अजून काहीतरी वाट्याला यायचं आहे

जे असेल ते सगळंच मिळवायचं आहे

लेकरांनो, तुम्हाला लहानाचं मोठं केलं

तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही

आमच्याजवळ काय दौलत आहे

हे पण कधी तुम्हाला सांगितलं नाही

आमच्या मनात कधी तरी इच्छा व्हायची

ही सगळी दौलत तुमच्यात वाटून ध्यायची

थोरला कमावतोय त्याला थोडी कमी

दुबळा आहे धाकटा, त्याला थोडी ज्यास्त

मधल्याचा पण काढायचा तसाच वाटा

लेकीसाठी ठेवू या हिस्सा जरा मोठा

पण आम्ही तसं कधीच केलं नाही

कुणाला कमी अधिक कधी दिलं नाही

तुमच्यावर लेकरांनो माया करताना

व्यवहार कधीच आम्ही केला नाही

मायेची वाटणी आम्ही कधी केली नाही

एकाला कमी,एकाला ज्यास्त कधी दिली नाही

राजा, तुमचा व्यवहारच खूप वेगळा

मला किती मिळेल हाच हिशोब सगळा

आम्हां दोघांमध्ये सुद्धा तुम्ही व्यवहार केला

हिस्से करून आमचे एकेक तुकडा अलग केला

राजा, सगळीच वाटणी पार पडलीय

आमची माया मात्र तशीच राहिलीय

बघ,तुमच्या व्यवहारामध्ये काही जमेल का

मायेची आमच्या वाटणी करता येईल का…

-©ॲलेक्स मच्याडो

Share दौलत | Wealth/Property

You may also like

One thought on “दौलत | Wealth/Property

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.