पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
अजुन एक सत्यकथा त्याच घरातली.
चौल ला असलेलं माझ्या आजीचं घर हे खूप गुढ वाटत मला कारण त्याचा इतिहास पण तसाच आहे. ते घर ज्यांचं होत त्या घरात पहीले नवरा बायको आणि मुलं असे राहायचे. त्या माणसाला तिकडचे लोक अप्पा नावाने ओळखायचे. अप्पा हा चांगला माणूस होता असं माझ्या ऐकिवात आहे.
जिथे माझी आजी आणि आजोबा राहायचे पहिले तिकडे एक भाडेकरू अप्पा ने ठेवले होते. भाडेकरू हे कुटुंब होतं. नवरा बायको आणि मुलं असं.अप्पाचा त्या घरात राहणाऱ्या बाई वर जीव जडला आणि त्या बाईचा पण अप्पा वर. त्यातूनच ती गरोदर राहिली आणि अप्पा ना ते घर तिच्या नावे करायचं होतं पण ते करायच्या आधीच काळाने अप्पा वर घाला घातला आणि त्या वेळेला ती बाई 9 महिन्याची गरोदर होती. अप्पा च्या बायकोने तिला आणि तिच्या कुटुंबाला घरा बाहेर काढलं. त्या नंतर काही महिन्यात त्या बाईचा नवरा पण ह्या जगात राहिला नाही.
त्या बाईला त्या घरातून काढल्या नंतर माझे आजोबा आणि आजी त्या घरात राहायला आले. त्या नंतर काही विचित्र घटना घडायला लागल्या. माझी आई सांगते की संध्याकाळी जेव्हा ते जेवायला बसायचे तेव्हा फडताळातले डब्बे जोरजोरात आपोआप हालायचे आणि त्यांच्या जेवणात माती पडायची आणि घाबरून बाजूच्यांना बोलावलं आणि बाजूचे आले की ताटात माती नसायची. माझी आई आजही म्हणते की तो भास होता की खरच काही हे सांगता येणार नाही.
चौल च्या त्या घराच्या पडवीच्या बाजूने एक जिना बांधलेला होता वरच्या खोलीत जायला. बाहेरच टॉयलेट आणि बाथरूम होतं आणि थोडंस पुढे विहीर आहे. एकदा माझी आजी रात्री भुत्या( केरोसीन चा बनवलेला दिवा) घेऊन टॉयलेट साठी निघाली असताना तिला तो अप्पा हातात कंदील घेऊन जिन्याने वर चढताना दिसला आणि मागे वळुन तिला म्हणाला की हे घर माझ्या तिचं आहे आणि इथे तुम्ही राहायचं नाही लवकरात लवकर हे घर सोडून जा. ते बघून आजी घाबरून घरात परत आली आणि तिने माझ्या आजोबांना घडलेला प्रकार सांगितला त्या नंतर आजोबांनी घराची बांधिलकी करून घेतली. पण म्हणतात ना की बांधिलकीची काही वर्ष असतात.
आता हे सगळे प्रकार खरे की खोटे हे मला माहित नाही कारण ह्या सगळ्या ऐकलेल्या गोष्टी आहेत. अनुभव हे ऐकण्या पेक्षा अनुभवण्यात सगळ्यात जास्त मज्जा असते. कारण अनुभवलेले अनुभव कागदावर उतरवण्यात जी मज्जा आहे ती ऐकिवात गोष्टीं मध्ये नाही कारण त्यात काही त्रुटी राहुच शकतात.
-©दर्शना पा गोखले
गावचं घर कथा 2 – Gaavch Ghar Katha 2 ही कथा आवडली असल्यास शेअर करा.
गावचं घर कथा 2 – Gaavch Ghar Katha 2 – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
2 thoughts on “गावचं घर कथा 2 | Gaavch Ghar Katha 2”