पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Dev Bhakti
मातृ-पितृ भक्त पुंडलीक थोर ।
त्या साठी विटेवर , देव थांबे ।।
पांचाली नि मीरा , दोन भक्ती वेड्या ।
संकटी वाटाड्या , कृष्ण सखा ।।
क्रांतिवीरा प्रीय , मायभूमी भक्ती ।
हसत तिच्यासाठी , प्राण देती ।।
धन्य शंभूराजे , धन्य धर्मभक्ती ।
प्राणांची आहुती , सहज दिली ।।
षोडशोपचार , नकोत पूजेला ।
भक्तीचा भुकेला , पांडुरंग ।।
शब्द हेच पुष्प , भक्तीची पाकळी ।
चरणी अर्पिली , प्रेमभाव ।।
8 thoughts on “देव भक्ती | Dev Bhakti”