पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Grand Paradi Haunted Tower
8th फ्लोर अनसॉल्व मिस्ट्री
मुंबई च्या मलाबार हिल मधे असलेला Grand Paradi Haunted Tower जसा त्यातून दिसणाऱ्या मुंबई च्या ग्रैंड व्यू साठी फेमस आहे तसा तिथे राहून गेलेल्या, राहणाऱ्या बिजनेसमन,डायमंड मर्चन्टस सारख्या श्रीमंत व्यक्तिन मुळे प्रसिद्ध आहे.जो टॉवर एकेकाळी श्रीमंत व्यक्तिनचा टॉवर म्हणून ओळखला जात असे जो आता मोस्ट हॉन्टेड टॉवर म्हणून ओळखला जातो तो त्या टॉवर च्या 8व्या मजल्या वरील बाल्कनी मुळे.या बाल्कनी मधून उड़ी मारून बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्यात.
याची सुरुवात झाली त्याच टॉवर मधे रहाणार्या मुलीमुळे या मुलीचे तिथल्याच स्लम एरियात राहणाऱ्या मुलावर प्रेम होत पण घरच्यानच्या विरोधा मुळे आणि डिप्रेशन मधे येऊन तिने या 8व्या मजल्या वरुन उड़ी मारून आत्महत्या केली आणि इथुनच आत्महत्या सत्रा ला सुरुवात झाली.त्या मुलीच्या आत्महत्ये नंतर त्या टॉवर मधे घरकाम करायला येणाऱ्या मावशीबाईने त्याच फ्लोर च्या बाल्कनी मधून उड़ी मारून आत्म्याहत्या केली.
त्यानंतर ही अजून एका घरकामाला येणाऱ्या मावशीबाईने आत्महत्या केली त्याच फ्लोर च्या बाल्कनीतून…त्यानंतर त्याच फ़्लोर वर राहणाऱ्या वयस्कर पति पत्नीनी त्या फ्लोर च्या बाल्कनी तून उड़ी मारून आत्महत्या केली. त्यानंतर काही वर्षां नी त्यांच्या एकुलत्या एक मुलाने ही पत्नी व मुलीसोबत त्याच बाल्कनीतुन उड़ी मारून आत्महत्या केली.त्या नंतर ही आत्महत्या प्रकरण चालूच राहिली….पुढे तो 8th फ्लोअरच सील करून टाकला.
परनॉर्मल रिसर्चर्स नी त्या फ्लोर वर जाऊन पहाणी केली असता तिथे बऱ्याच पैरानॉर्मल एक्टिविटी होत असलेल्या आढळून आल्या त्यांच्या जवळ असणाऱ्यां इकविपमेंटस मधे,मिटर्स मधे रीडिंग येऊ लागली.आणि बऱ्याच निगेटिव एनर्जी त्या ठिकाणी वावरत असल्याच जाणवत होत..काहीं च अस म्हणण आहे की ज्या ज्या लोकांनी या फ्लोर वरुन आत्महत्या केल्यात त्यांचे आत्मे या फ्लोर वर घुटमळत आहेत.
7 व्या फ्लोर वर च्या रहीवासियांना ही या 8व्या मजल्या वरुन अनेक विचित्र अनुभव आलेत.सम्पूर्ण फ्लोर सील असून ही फ्लोर वरुन चालण्याचे,ग्रिल वाजवण्याचे,दरवाज़े उघडून बंद करण्याचे आवाज येत असतात.त्या फ्लोर वर जाण्यास बंदी असून 9व्या मजल्यावर जाण्यास सक्ति ने लिफ्ट चा वापर केला जातो.अस क़ाय होत त्या फ़्लोर वर की जो तिथे जात व रहात त्याच्या मनात सुसाइडल टेंडसी निर्माण होत असे व तो त्यातच आपल जीवन सम्पवत असे हे आज ही न उलघड़लेल रहस्य आहे.
ग्रँड परडी हॉन्टेड टॉवर – Grand Paradi Haunted Tower हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
ग्रँड परडी हॉन्टेड टॉवर – Grand Paradi Haunted Tower – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “ग्रँड परडी हॉन्टेड टॉवर | Grand Paradi Haunted Tower”