पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Ego is the enemy
कळिकाळाहून
महा भयंकर
षड्रिपू हे क्रूर
मानवासी
क्षणोक्षणी उठे
मनी अहंकार
सत्याचा संस्कार
विसरला
प्रासादी कोंडले
सर्व देवगण
गर्वाने रावण
अंध झाला
आसक्तिने केले
जानकी हरण
कौसल्या नंदन
वधी तया
ज्ञान अहंकारी
वृद्ध चांगदेव
भेटे ज्ञानदेव
लिनतेने
निर्जिवची भिंती
योगे चालविली
भ्रांती निपटिली
सहजचि
खान म्हणे कोण?
कोठला हा शिवा?
धरीन हा चुहा
मुठीत मी
वाघाच्या नखांनी
काढला कोथळा
शिवे निर्दाळिले
क्रूरकर्मा
सांगती चैतन्य , रामनामसार
जाळी अहंकार , सत्य जाणा
-©पुष्पा पेंढरकर
आदरणीय बाई, आपले व या उपक्रमात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांचे खुप खुप अभिनंदन, खरंच खुप छान कविता व सादरीकरण..
आपला
शंतनु श्रीपाद पेंढरकर