Sushant Singh Rajput, Bhabha Atomic Research Center, Maagil Janam ani Mi

सुशांतसिंग राजपूत, भाभा अटॉमीक रिसर्च सेंटर, मागील जन्म आणि मी

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

सुशांतसिंग राजपूत, भाभा अटॉमीक रिसर्च सेंटर, मागील जन्म आणि मी – Sushant Singh Rajput, Bhabha Atomic Research Center, Maagil Janam ani Mi

Sushant Singh Rajput, Bhabha Atomic Research Center, Maagil Janam ani Mi

आम्हा विज्ञान प्रेमींना भाभा अटॉमीक रिसर्च सेंटर (Bhabha Atomic Research Center) म्हणजे तीर्थ क्षेत्रच. सातवित असतानाच मी न्युक्लीयर फिजीसीस्ट व्हायचे ठरवले होते.

तेंव्हा मी आणि माझा मित्र विश्वास बोभाटे आम्ही भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर (Bhabha Atomic Research Center) मध्ये खूप चकरा मारल्या. अगदी प्लुटोनियमच्या कांड्यांना हात लावून सुद्धा पाहिले. पण लौकरच भ्रम निरास झाला. आपण संशोधन करायचे आणि क्रेडीट आपल्या बॉसने घ्यायचे हे काही पटेना.

तेंव्हा तेथील सहा कि दहा तरुण शास्त्रज्ञांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. एक पाकिस्तानी हेर तरुणीही पकडली गेली. पुढे काही जणांचे अपघाती मृत्यूही झाले.

तेंव्हा तो नाद सोडून इलेक्ट्रोनिक्स मध्ये संशोधन करायचे ठरवले. आपण आपल्या घरातील दोन टेबलांवर संशोधन करायचे म्हणजे कोणाला चोरताच येणार नाही.

पुढे डायबेटिक पॉलीन्युरोपॅथीचे लवकर निदान करायचे इन्स्ट्रुमेन्ट बनवले. त्यावर डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये चारशे डॉक्टरांसमोर प्रेझेंटेशन दिले.

तर आमच्या एका स्पर्धकाने माझ्या हातातून माझ्या नोटस् हिसकावून पळवल्या आणि त्याची भ्रष्ट कॉपी बाजारात आणली. पण आम्ही आमच्या क्वालिटी मुळे बाजारात टिकून राहिलो.

पुढे पुन्हा भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरशी (Bhabha Atomic Research Center) संबंध आला तो १९७७ मध्ये. त्यांच्या वीस वर्षांच्या संशोधनावर, खोटेपणाने संशोधन करून पाणी ओतायचा प्रकार एकाने केला होता. बदल्यात त्याला ICMR म्हणजे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा डायरेक्टर जनरल करण्यात आले.

त्याचा सगळा खोटेपणा उघडकीस आणून ती माहिती तेंव्हाचे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या पर्यंत पोहोचवली आणि त्यांनी त्याला घरी बसवला. तेंव्हाच भारताच्या अन्नसुरक्षेचा पाया घातला गेला. मला पण देशऋण फेडल्याचे समाधान मिळाले.

आज पुन्हा बरीच ढोंग उघडकीस आणायची वेळ आली आहे असे दिसते.

मला एक ऑपरेशन माहित आहे. त्याचा फक्त ३५ टक्के रुग्णांना फायदा होतो. मग परत तेच ऑपरेशन करायचे. मग एकूण ६५ टक्के रुग्णांना फायदा होतो. पण ३५ टक्के लोक बरे होत नाहीतच.

त्या साठी दोन घरगुती उपायही आहेत. ते तीन दिवस ते सात दिवसात बरे करतात. म्हणून उपाय किंवा औषध नेमके कशाला म्हणायचे? हे जागतिक पातळीवर ठरवण्याची वेळ आलेली आहे. पाच दहा टक्के फायदा होण्याची शक्यता असलेली औषधे लाखो रुपयांना रोग्यांना दिली जात आहेत. पण ज्या औषधांनी पाच सात दिवसात रुग्ण बरे होतात ती औषधे द्यायला बंदी घालायची, असा प्रकार सध्या चालू आहे.

कोर्टासारखा डॉक्टरांनाही कागद लागतो. आणि हा कागद ट्रायल्स केल्यावरच तयार होतो. त्याला रिसर्च पेपर असे म्हणतात. रोश कंपनी सांगते की आमचे औषध टोसीलीझुंब कोरोनावर परिणामकारक नाही आणि तरीही ते दिली जात आहे. त्याच्यावर कारवाई नाही.

पण आयुष डॉक्टरांना कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत.

अगदी सुरवातीला सेव्हन हिल्स आणि नायर हॉस्पिटल मध्ये करोना पेशंटवर होमिओपॅथी औषधांच्या ट्रायल्स करू दिल्या. पण त्या फारच यशस्वी झाल्यावर परत अशा ट्रायल्सना परवानगी देणेच बंद केले.

आयुष मंत्रालयाने, ज्या पेशंटना आयुष औषधे घ्यायची आहेत त्यांना जर त्यांच्या हॉस्पिटलने परवानगी दिली तर आयुष उपचार द्यायला परवानगी दिलेली आहे.

पण काही खाजगी हॉस्पिटल्स सोडली तर महाराष्ट्रातील बहुतांशी सरकारी हॉस्पिटल्स, आयसोलेशन सेन्टर्स त्याला परवानगीच देत नाहीत. इतर राज्यात त्याला परवानगी आहे म्हणून तेथे मृत्यू दर कमी आहे या महत्त्वाच्या बाबीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.

खाजगी हॉस्पिटल मध्ये जिथे होमिओपॅथी औषधे दिली जातात तेथील रिझल्ट्स अतिशय परिणामकारक आहेत. फक्त एखाद दोन टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. पोस्ट कोविड त्रासही होत नाहीत. ज्यांना झाले आहेत तेही बरे होत आहेत. मुख्य म्हणजे मृत्यूही फारसे होत नाहीत.

पण नाही, मग आमची ठाकूरकी कशी राहील? होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा आपल्या मर्यादा ओळखतात. एका मर्यादेपर्यंत इन्फेक्शन असेल तर ते बरे करतात. पण इन्फेक्शन वाढले तर सरळ अॅलोपॅथी डॉक्टरकडे अँटिबायोटिक्स व इतर उपचार घेण्यासाठी पाठवतात. प्रत्येक उपचार पद्धतीच्या मर्यादा असतात. त्या ओळखून वागले पाहिजे.

आपल्या कडे व्हायरस वर उपचार नाहीत तर नाहीत. त्यात लाज कसली?

नोसोड म्हणजे होमिओपॅथी ची लस आणि औषध, ती या दोन्ही प्रकारे काम करते. ती तयार आहे. अगदी जगभर अनेक देशात तयार आहे. पण भारतात त्याच्या ट्रायल्स घ्यायला परवानगी दिली जात नाही. त्यासाठी ICMR, WHO च्या मार्गदर्शक सूत्रांचा संदर्भ दिला जातो.

आत्तापर्यंत दुसऱ्याचे संशोधन चोरणे एव्हढेच होत असे पण आता दुसऱ्याला संशोधन करताच येऊ नये हि पुढची पायरी गाठण्यात आलेली आहे, त्यासाठी संबंधितांनी या प्रगतीसाठी स्वतःची पाठ थोपटून घ्यावी.

पेटंटला वारसा हक्क नाही त्यामुळे संशोधकाला मारून टाकायचे आणि त्याचे संशोधन वापरायचे असेही सुरु झाले असल्यास नवल नाही.

१९९३ मध्ये मी स्पीच ऍनालायझर बनवला होता. तेंव्हा कॉम्प्यूटर नव्हते. १७५ आयसी वापरून बनवले होते. आवाजातील सूक्ष्म फरक त्याने ओळखता येतात.

बहिऱ्यांना बोलायला शिकवणे, परदेशी भाषा शिकणे वगैरे अनेक उपयोग आहेत त्याचे. दुर्दैवाने आम्हाला तेंव्हा त्याचे मार्केटिंग जमले नाही, नाहीतर ते आज समाजाच्या उपयोगी आले असते.

अर्थातच आता सोफ्टवेअरच्या सहाय्याने ते मोबाईल मध्येही करता येऊ शकते. असो.

मागे माझ्या एका नवीन संशोधनाचा मी फेसबुकवर उल्लेख केला तेंव्हा एका आंतरराष्ट्रीय षड्यंत्राने माझ्या व्यवसायावर आर्थिक हल्ले केले होते. ते परवडले एक वेळ. पण आता त्याचे भयानक रूप समोर येत आहे.

डॉक्टर होऊन लोकांना बरे करण्याची क्षमता, सत्ता आणि आर्थिक सुबत्ता अशा गोष्टी, मागील जन्मातील पुण्याशिवाय होत नाहीत. त्याचा जबाबदारीने वापर केला पाहिजे.

मांडव्य ऋषीना चोर समजून सुळावर चढवण्यात आले होते. तीन दिवस ते सुळावर होते तरी मेले नाहीत, तेंव्हा राजाला आपली चूक उमजली. त्याचे कारण यमधर्माने सांगितले. ते लहानपणी चतुर पकडून त्याच्या शेपटीत काटा खुपसीत असत, म्हणून त्यांना हि शिक्षा झाली होती.

जीझसना कृसिफाय करण्यात आले ते त्यांच्या मागील जन्मातील एका चुकी मुळे. बायबल मध्ये आहे ती कथा.

अशा थोरा मोठ्यांना जे चुकले नाही त्या समोर तुमची आमची काय कथा. आपण औषधे उपलब्ध असताना, लस उपलब्ध असताना, ती वापरू न देण्याचा अक्षम्य अपराध करत आहात.

स्वतःला देव समजून यमाचे काम आपल्या हातात घेऊ नका. अजूनही जागे व्हा. आंतरराष्ट्रीय षडयंत्राला बळी पडू नका. या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात भोगायाचेच आहे ते.

प्रेताला गुंडाळण्याचे प्लास्टिक तरी पारदर्शक वापरा. लोकांना निदान आपल्या नातेवाईकांचे अंत्य दर्शन तरी घेउद्या. का त्यातही WHO च्या गाईडलाइन आहेत.?

लोकांना वाचवा. लोकांचे तळतळाट फार वाईट असतात. भोगावे लागते.

आणि जबाबदार म्हणून राष्ट्रप्रमुख आणि राज्य प्रमुखांनाही हे भोगावे लागते.

वर्ग विशेष वैद्यक सत्ता, राज्यसत्तेवर हावी होऊ देऊ नका.

©️धनंजय केशव केळकर

सुशांतसिंग राजपूत, भाभा अटॉमीक रिसर्च सेंटर, मागील जन्म आणि मी – Sushant Singh Rajput, Bhabha Atomic Research Center, Maagil Janam ani Mi Source

Sushant Singh Rajput, Bhabha Atomic Research Center, Maagil Janam ani Mi हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

Sushant Singh Rajput, Bhabha Atomic Research Center, Maagil Janam ani Mi – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share Sushant Singh Rajput, Bhabha Atomic Research Center, Maagil Janam ani Mi

You may also like

2 thoughts on “सुशांतसिंग राजपूत, भाभा अटॉमीक रिसर्च सेंटर, मागील जन्म आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO