पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Friends are crazy
केव्हाही येतात केव्हाही जातात
मनाची दारं उघडीचं टाकतात
आपल्या सुखात खळखळून हसतात
आपल्या दुःखात पिळवटून रडतात
मित्र मैत्रिणी वेडेच असतात.!!
जवळची नातीसुद्धा परकी होतात
दिलं, घेतलं हिशाोबात अडकतात
तिथं हेच सावरायलाच असतात
सावरलं की अलगद बाजुलाही सरतात
मित्र मेैत्रिणी वेडेच असतात.!!
रक्ताच्या नात्याचे नसतात
अग्निसमक्ष जोडलेले नसतात
एखादया अवचित हळवया क्षणी
अद्वैत साधून मनात शिरतात
मित्र मैत्रिणी वेडेच असतात.!!
सारे माझे तयांना ठाऊक असते
सारे तयांचे मला ठाऊक असते
कोठे काय बोलायचे उमजलेले असते
काय ओठांच्या आत हवे माहित असते.
मित्र मैत्रिणीं वेडेच असतात.!!
बालपणीचे निरागस बंध
तारुण्यातील उनमत्त गंध
प्रौढपणीचा समजदार संग
अवघे आयुष्य माझे रंगारंग
मित्र मैत्रिणी वेडेच असतात.!!
मैत्री खरंच अशी अनमोल असते.
प्रत्येक जीवाने अनुभवायाचीअसते.
खुळ्या सोनेरी उन्हासारखी
आयुष्यात मैत्री जुळावी लागते.
9 thoughts on “मित्र मैत्रिणी वेडेच असतात | Friends are crazy”