पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
दावी कौतुक तो दयाघन प्रभू
या मानवी जीवनी
योगायोग म्हणो कुणी तया
मी नित्यची संभ्रमी
त्यावेळी अशी एक मौज घडली
साहित्य सम्मेलनी
नाना ग्रंथ नि पुस्तके बघुनिया
गेले तिथे रंगुनी
पाठीमागून ये कुणी अवचिता
डोळे कसे झाकले
जादू काय घडे अशी भय मुळी
नाही मना वाटले
तू लीला आणि मी सुमन ग
काही स्मरे का तुला
किती वर्षांनीं भेटलीस तू
तरी ओळखले तुला
मौज बघ तरी योग भेटीचा
प्रीती संगम तिरी
विसमयकारक असेल घटना
याहून का दुसरी
सुख दुःखात ही समीप राहिलो
या भेटी नन्तर
मात्र सखी मज गेली सोडूनि
दुखुऊनी मम अंतर
-©पुष्पा पेंढरकर
2।4।21
4 thoughts on “सखी | Sakhi”