पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Pustak
पुस्तक म्हणजे निर्मळ दर्पण
दिले प्रभूने अमोघ दान
नऊ रसांचे इथे आकलन
विविध विषय मांडीती सुज्ञ जन
अखंड चाले विचार मंथन
भवसागर हा पार कराया
सुकाणूच की पुस्तक साधन
कामधेनू ती कल्पतरू हा
ज्ञानसुर्यची मूर्त मानवा
संत सज्जना ग्रंथ विसावा
भक्तीतून सन्मार्ग दाखवित
ईश चरणी विश्राम
ग्रंथ अनंत नि अगणित शास्त्रें
गाती शाहीर शूर चरित्रे
पुस्तकाविना विश्वची रिते
अनायास विश्व सहल ही
होई सुखे या ग्रंथातून
-©पुष्पा पेंढरकर
२३/०४/२१
4 thoughts on “पुस्तक | Pustak 2021”