Uttarayan--a presentiment

उत्तरायण – एक चाहूल | Uttarayan | Makar Sankranti

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Uttarayan | Makar Sankranti

बाळसं धरायला थंडी चांगलीच म्हणतात,पण शरीर गोठवणारी थंडी मला मुळीच आवडत नाही.रेशीमकिड्याने जसं स्वत:ला कोषात अडकवून कोंडून घेतल्यासारखे..
झालं असं कि कधी एकदा मकर संक्रांत येते आणि सूर्याच उत्तरायण सूरू होतेय याची मी फारच वाट बघते.तीळ आणण,धुवून वाळवणं ,गुळाला घासून डब्यात भरणं सार मोठ्या उत्साहात सुरू असतं.पण यावर्षी तर पाऊस धो धो कोसळतोय.

चार दिवसांपूर्वी सकाळी सकाळी फोन .वहिनी ताप चढलाय,येत नाही.इति कामवाली.मग काय स्वयंपाक आटोपुन मशीनमधुन कपडे धुतले.आणि मशीन जरा जागेवर सरकवली, आणि बादली उचलणार तोच एक जबरदस्त कळ कमरेत आली.झालं,मला हलताही येईना.सुदैवान मुलगा घरी होता.स्प्रे केलं,बाम चोळून झालं ,गोळ्या घेऊन झालं पण काही फायदा होईना.पण याही स्थितीत स्वयंपाक सूरू होताच.
उठत,बसत तीळगुळाचे लावु वळलेच,भोगीला गुळपोळीचा नैवेद्य दाखवलाय.आणि शाब्बास रे पठ्ठी म्हणून स्वत:च कौतुक केलं.

आज संक्रात, पहाटेपासून रावण ढग आकाशात.
मरणाची थंडी आणि गार बोचरा वारा .पंतगवीर डेकच्या शस्त्रानिशी तय्यार.मी आपली कमरेला बेल्ट बांधुन नैवेद्य करते आहे.सगळे नवरा,मोठा मुलगा साईटवर,तर छोटा पंतग उडवायला मित्रांकडे.साहेब आता संध्याकाळीच उगवणार.
कधी नव्हे तो आज मला खूप उबग आला होता.मी आज घरात एकाकी पडले होते.पाऊस धो धो कोसळत मला चिडवत होता.

मी आवडीचं पुस्तक घेऊन समोर ओसरीत आले.पाळण्यावर झोके घेत मरगलेल्या मनाचा तोल सांभाळत गझल ऐकत एक एक क्षण पुढे ढकलत होते.का कोण जाणे आज मला फारच एकाकी वाटत होतं. कुणीही सोबत नाही याची जाणीव वारंवार होत होती.
आणि अचानक ढगाळलेल्या आकाशाचा पडदा दूर सारून सूर्याच आगमन झालं.

आठवलं अरे आता तर उत्तरायण सूरू होईल. शिशिराची पानगळ दूर सारुन वसंत मोठ्या दिमाखात सृष्टीत विराजमान होईल.कुठेतरी जाणवलं, आता मुलं मोठी झालीत.एक आभाळ संपलयं.आता आपल्याही आयुष्यत उत्तरायण सूरू होणार. हा एकाकीपणा येणारचं. पण आपण तो वसंताप्रमाणे साजरा करायचा.अगदी दिमाखात.
सूर्याचं हे उत्तरायण मला माझ्या भविष्याची चाहूल तर देत नसेल ना.बघू ते काळच ठरवेल पण मी मात्र क्षण क्षण जगणार.
तेवढ्यात कुठेतरी डेकवर गाणं वाजत होतं.
सांज ये गोकुळी, सावळी सावळी,
सावळ्याची जणू सावली.
देवयानी कळमकर.

उत्तरायण – एक चाहूल|Uttarayan | Makar Sankranti हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

उत्तरायण – एक चाहूल|Uttarayan | Makar Sankranti– आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share उत्तरायण – एक चाहूल | Uttarayan | Makar Sankranti

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock