पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Crossing Ninety
दयासागरा, माझी जीवन गाथा तू लिहिलीस
मला उत्तम शरीर संपदा आणि बुद्धी देऊन माझ्या कडून त्या गाथेला तू साकार केलेस
न मागताही अपरंपार दिलेस, देतच राहिलास ।
मूर्तीमंत वात्सल्य तू निरुपमेय आहेस, काय म्हणू मी तुला
शब्दही तर तुझेच आहेत, सारंच तुझे आहे
माझी झोळी आता ओसंडून वाहायला लागली आहे ।।
मात्र एक मागणे अजून आहेच
कारण, शेवटी मी एक मानव
मला परावलंबी करू नकोस
माझ्या अगदी निकट तू रहा
जे जे मला देता येणे शक्य आहे
ते ते मुक्त हस्ते दुसऱ्याला देण्याची मला बुद्धी दे ।।
अन शेवटच्या क्षणी तुझे नाम मुखात येऊ दे ।।।
श्री राम जय राम जय जय राम..
-©पुष्पा पेंढरकर
भाद्रपद अमावस्या
०६.१०.२०२१