पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Mujhe Jaan Na Kaho Meri Jaan
मेरी जान मुझे जान
न कहो मेरी जान
मेरी जान मेरी जान
मुझे जान न
कहो मेरी जान
मेरी जान मेरी जान
जान न कहो अजान मुझे
जान कहाँ रहती है सदा
जान न कहो अजान मुझे
जान कहाँ रहती है सदा
अजाने क्या जाने
जान के जाए कौन
भला मेरी जान
मुझे जान न
कहो मेरी जान
मेरी जान मेरी जान
सूखे सावन बरस गए
कितनी बार इन आँखों से
सूखे सावन बरस गए
कितनी बार इन आँखों से
दो बड़े न बरसे
इन भीगी पलको से
मेरी जान मुझे जान
न कहो मेरी जान
मेरी जान मेरी जान
होठ झुके जब होठों पर
हाथ लिखे है ांसो मैं
होठ झुके जब होठों पर
हाथ लिखे है ांसो मैं
दो जुड़वाँ होठो की
बात कहूँ आँखों से
मेरी जान मुझे जान
न कहो मेरी जान
मेरी जान मेरी जान
मुझे जान न
कहो मेरी जान
मेरी जान मेरी जान.
कवी : गुलझार (Gulzar)
गायिका: गीता दत्त (Geeta Dutt)
संगीतकार: कनू रॉय (Kanu Roy)
चित्रपट: अनुभव (१९७१)
आजच्या जगात कामाच्या व्यस्ततेमुळे घरच्या मंडळींना कमी वेळ देणे ही गोष्ट घरोघर मातीच्या चुलींसारखी आहे. पण पन्नास वर्षांपूर्वी तशी नव्हती. कामाच्या व्यस्ततेमुळे नवरा आपल्या नवविवाहित पत्नीला वेळ देऊ शकत नाही आणि त्यातून उद्भवणारे कटुप्रसंग या चित्रपटात आहेत. काही प्रसंग विनोदाने आणि काही प्रसंग गंभीरतेने चित्रित केले आहेत. हा चित्रपट काळाच्या पुढे होता असे मला वाटते.
सोबतचे गाणे गीता दत्तने शेवटच्या गायलेल्या गाण्यांपैकी आहे. गोड आवाज तसेच भावनेने ओथंबलेले गाणे ही गीताच्या गायकीचे मर्मस्थान आहे असे मला वाटते. अनेक दिवसानी पतीला थोडा मोकळा वेळ मिळाला आणि त्यानंतर झालेला आनंद आणि त्यातून झालेला प्रेमसंवाद या गाण्यात शब्द आणि सुरांतून व्यक्त होतो. तो काव्यार्थ आणि भावार्थ श्रोत्यांना व्यवस्थितपणे पोचतो. तेव्हा गाण्याबरोबर फार थोडी वाद्य आहेत पण त्याने काही फरक पडला नाही.
फक्त एक गोष्ट जाणवते अनेक वर्ष निराशेत आणि निराशेमुळे व्यसनाधीन झालेली गायिका आणि त्याचा आवाजावर झालेला परिणाम काही प्रमाणात जाणवतो. तरीही गाण्याच्या सौंदर्यात काही फरक पडला नाही. कारण मनापासून गायलेले गाणे श्रोत्यांपर्यंत पोचते. गाण्याच्या शेवटास मेरी जान हे शब्द गाताना जे आर्जव पुढे येते ते गाण्याचे सौंदर्य वाढवते. तसे गाताना हसण्याचा भाव अतिशय सुंदरतेने पुढे येतो तो असामान्य आहे. त्यामुळे गीता दत्तच्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी हे एक आहे.
गाण्याची चित्रफीत – https://www.youtube.com/watch?v=F6FkVPOMtvM
आजच्या पिढीची प्रसिद्ध गायिका निहिरा जोशी देशपांडे हिने हेच गाणे उत्तमपद्धतीने सादर केले आहे.
गाण्याखेरीज गीताकडून एक अतिशय चांगली गोष्ट घडली. संगीतकार ओ पी नय्यर यांचे पहिले दोन चित्रपट लोकप्रिय झाले नाहीत. त्यामुळे निराश झालेले नय्यरसाहेब परत आपल्या घरी जाणार होते. पण गीताने त्यांना थांबवले धीर दिला आणि गुरुदत्तशी बोलून त्यांना बाज आणि आर पार हे चित्रपट मिळवून दिले. हे दोन्ही चित्रपट आणि त्यातील गाणी लोकप्रिय झाली आणि नय्यर यांनी मागे वळून पहिले नाही. गीताने हे काम केले नसते तर आपण रसिक नय्यर यांच्या गाण्यांना मुकलो असतो.
आज गीतादत्तला (Geeta Dutt) या नश्वर जगातून जाऊन पन्नास वर्ष होऊन गेली. पण अनेक रसिक तिला विसरले नाहीत. तिची स्वतंत्र गाणी तसेच रफीसाहेबांबरोबर गायलेली युगलगीते आजही आवडीने ऐकली जातात.
गीता दत्तच्या (Geeta Dutt) स्मृतीस आणि कलेस माझे दंडवत.
-©शैलेश दामले
२९-जानेवारी-२०२२