पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Sangam
साधेच शब्द सखी लिहीत होते
वेळी अवेळी कधीही
साज लेउनी , तव कंठातुनी
मधुर होऊनि येती
चालीवर ऐकता गीत ते
क्षणभर विस्मित होते
शब्द हे माझेच का ?
मीच मनाला पुसते
शब्द सुरांची , किती जन्मांची
जुळून आली नाती
सुरेख संगमी , मिळे कोयना
पावन कृष्णाकाठी
शब्द संपले , सूरही थकले
तरीही स्वप्नी ऐकते
गीत माझे , सूर तुझे
रेशमी हा गोफ विणीते
One thought on “संगम | Sangam”