पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Foods in Oblivion
आजच्या पिढीला पिझ्झा, पास्ता, बर्गर, चायनिज, शितपेये आवडतात. असे काही पदार्थ आहेत आपल्याला माहित आहेत.पण आपण ते विसरून गेलो आहोत. ते आठवूयात. नव्या जुन्याचा संगम करून सगळे पदार्थ खाऊयात.
- मेतकुट भात-गरम गरम भात त्यावर मेतकुट वरून साजूक तुपाची धार.
- कणकेची खीर- थोडी कणिक पाण्यात भिजवून घ्यावी, साखर घालावी व कणिक शेगडीवर शिजत ठेवावी,कणिक शिजत आली की कपभर दूध घालावे.एक उकळी फुटली की खीर तयार .
- कणिकेचे धिरडे- कणिकेत मीठ टाकुन कणिक कालावून घ्यावी, शेगडीवर तवा ठेवून तो गरम करवा. तवा गरम झाल्यावर पळीने धिरडे घालावे , एका बाजूने झाले की ते उलटे करावे,दुसऱ्या बाजूने लाल झाले की गरम वाढावे.
- दूध पोहे-एका भांड्यात पोहे घेऊन ते भिजवून ठेवावेत. पाच मिनिटांनी त्यात साखर व दूध घालावे व ख्याल दयावे.
- दही पोहे- एका भांड्यात पोहे घेऊन ते भिजवून ठेवावेत,पाच मिनिटांनी त्यात दही घालून ,मीठ ,साखर घालावी. नंतर फोडणी करून त्यात मिरची टाकवी ही फोडणी पोह्यांवर ओतावी , सगळे एकत्र करून खायला दयावे.
- दही साबुदाणा- एका भांड्यात साबुदाणा भिजत ठेवा,एक तास नंतर त्यात मीठ,साखर,दाण्याचा कूट घालावा,दही घालून चांगले एकत्र करावे व खायला दयावे.
- पोळीचा लाडू- रात्रीच्या उरलेल्या पोळ्या चांगल्या कुस्करून घेऊन त्यात गूळ व साजूक तूप घालून लाडू तयार करावेत
- फोडणीची पोळी- रात्रीच्या पोळ्या कुस्करून घ्याव्यात, कांदा चिरुन घ्यावा, फोडणी करावी त्यात कांदा चांगला परतुन घ्यावा, त्यातच दाणे घालावेत , कांदा मऊ झाला की कुस्करलेल्या पोळ्या घालाव्यात त्यातच तिखट, मीठ, साखर घालावी चांगले परतून वाफ आणावी.गरम खायला दयावे.
- फोडणीचा भात- रात्रीचा भात हाताने चांगला मोकळा करून घ्यावा, कांदा चिरून घ्यावा, फोडणी करून त्यात कांदा चांगला परतून घ्यावा, त्यातच दाणे घालावेत, भात घालवा, मीठ ,तिखट, साखर घालावी चांगले परतून वाफ आणावी. गरम गरम खायला दयावे.
- दडपे पोहे-एका मोठ्या पसरट भांडयात पोहे घ्यावेत,त्यावर थोडे थोडे पाणी शिंपडून ओलसर करावेत, त्यात ओले खोबरे , कोथिंबीर, मीठ,साखर घालावी,फोडणी करावी, त्यात मिरची, दाणे,घालावेत ,ही खंमग फोडणी पोह्यांवर ओतावी, चांगले एकत्र करावे व थोडया वेळ झाकून ठेवून दयावे . दहा मिनिटानंतर खायला दयावे.
–©️ सौ.मुग्धा झाडगावंकर
विस्मृतीतील पदार्थ | Foods in Oblivion हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
विस्मृतीतील पदार्थ | Foods in Oblivion – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.