The Last Ganesha Idol

शेवटची गणेश मुर्ती | The Last Ganesha Idol

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

The Last Ganesha Idol

त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे ‘तो’ आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.

दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा… बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा… ‘कितना को..दिया..गणेशजी?’

दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा ‘अंकल…साडे छहसो रुपये…सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?’

तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी.. ‘अय्यो….ईतना..?’ असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.

बाजूच्या चौकात भाजी विकायचा तो.. रात्री गाडी त्या चौकातून ढकलत, आपल्या एक खोलीच्या घराकडे, आपल्या आठ वर्षाच्या पोराला गाडीवर बसवून तो जायचा. गाड्यावर उरलेल्या थोड्याफार भाजीचा अजिबात भाव न करता जे गि-हाइक अगदी निघताना येइल त्याला तो ती भाजी विकून टाकायचा. दुस-या दिवशी जी भाजी जवळपास खराबच होणार, ती कमी किमतीत का होइना, कोणाच्या तरी पोटात जावी, एवढीच त्याची माफक अपेक्षा असायची.

गणेश चतुर्थीच्या दिवशी दुकानातले सगळे गणपती तर खरेदी होत नाहीत. जसा दिवस पुढे सरकेल तसा त्या मुर्तींचा भाव देखील भाजी प्रमाणे कमी होइल, अशी भाबडी अपेक्षा ठेउन तो त्या गणेश मुर्तींच्या स्टॉल मधे दिवसभर येउन किंमत विचारुन जात होता.

आता त्याला जाताना पाहून, दिवसभरात पहिल्यांदाच स्टॉलवर आलेले दुकान मालक आनंदरावांनी स्टॉलवर विक्री करणा-या त्या मुलाला बोलवून घेतलं व विचारलं.. ‘रवी..काय रे मुर्ती नाही पसंत पडली त्याला..? तसाच गेला तो..मूर्ती न घेता..’

‘अहो काका..नुसता टाइमपास माणूस आहे..सकाळपासून सहा सात वेळा स्टॉलवर येउन गेलाय. ती कमलारुढ मुर्ती कितीला हे विचारतो आणि आम्ही किंमत सांगितली की चेहरा बारीक करुन निघून जातो..’

‘अरे मग विचारायचं की..त्याच्याकडे किती पैसे आहेत?’

‘अहो काका..त्याच्या अवतारावरुन वाटतं का तुम्हाला, की त्याच्याकडे साडेसहाशे रुपये असतील म्हणून? फाटका माणूस आहे..उगीच येउन स्टॉल फिरुन, किंमत विचारुन जातो. मला तर वाटत की चोर बीर तर नसेल ना?’ रवी बोलला.

‘नाही रे रवी. जेवढी माणसाची पारख मला आहे त्यावरुन मला वाटतं तो चोर नाही..हां..पण गरीब जरुर आहे..’

तेवढ्यात काही तरी आठवून आनंदराव बोलले..

‘अरे हो ..आता आठवलं..हा माणूस इथेच वीर बाजी चोकात स्टेट बॅंकेसमोर भाजीचा गाडा लावतो. अरे मागच्या महिन्यात रात्री नउ वाजता मी जेवण करुन रात्री फिरायला चाललो होतो तेंव्हा याच्याकडे थोडी भाजी घेतली.मग फिरुन तिथून माघारी घराकडे जाताना याने मला परत बोलवून त्याच्याकडची सगळी भाजी फक्त दहा रुपयात देउ केली. जवळ जवळ शंभर एक रुपयाची भाजी होती. मी नको म्हंटलं तरी ऐकेना. मग मीच विचार केला की याचे हातावरचे पोट..कशाला त्याचे नुकसान करा..म्हणून मी शंभर रुपये काढून दिले. पण आश्चर्य म्हणजे त्याने दहा रुपयांच्यावर एक पैसाही घेतला नाही. मला अजूनही आठवतय तो म्हणाला होता.. ‘साब..पेट भरने के लिये जितना चाहिए उतना तो आज कमा लिया…बस्स..आपसे जादा पैसा मै लेगा, तो पाप लगेगा..’

आनंदराव स्वतःशीच हसले. हा किस्सा ऐकून आचंबित झालेला रवी व दुकानातली बाकी मुले परत स्टॉलवर आलेल्या इतर लोका़कडे वळाली.

रात्रीचे साडे नउ वाजता गणेश मुर्ती नेणारी शेवटच्या गणेश मंडळाची मुले येउन मूर्ती घेउन गेली व आनंदरावांनी पोरांना आवरायला घ्यायला सांगितले. दुकानाच्या बाहेरघ्या पंडालमधे ठेवलेल्या मुर्ती, रॅक, टेबल, खुर्च्या, सगळे आत दुकानात आणू लागले. कमलारुढ गणेशाची मुर्तीला आज खूप मागणी होती. तब्बल पन्नास मुर्ती विकल्या गेल्या होत्या. केवळ एक मुर्तीच (The Last Ganesha Idol) शिल्लक होती.

काही सामान न्यायला बाहेर येत आनंदरावांची नजर रस्त्यावर गेली. रस्त्यावर तोच भाजीवाला आपला गाडा व मुलाला घेउन बाहेरुन आत दुकानात पहात होता. आनंदरावांनी त्याला पाहिले तसा तो बावचळला व पोराला पाठीवर हलकीच थाप मारुन चल चल असे म्हणत पुढे निघाला.

आनंदरावांनी पटकन पुढे होत त्या भाजीवाल्याला हाक दिली..’ओ अण्णा….इथर आओ..’

अण्णा जागेवरच थांबला. गाडा एका बाजूला लावून भाजीवाला अण्णा आपल्या पोराला हाताशी धरुन त्यांच्या समोर आला.

‘आओ,,,अंदर आओ..’ असे म्हणत आनंदराव त्या दोघांना आत घेउन आले.

त्याची नजर भिरभिरत ‘त्या’ कमलारुढ गणेशाच्या एकमेव मूर्तीवर रात्रीचे साडे नउ वाजता गणेश मुर्ती नेणारी शेवटच्या गणेश मंडळाची मुले येउन मूर्ती घेउन गेली व आनंदरावांनी पोरांना आवरायला घ्यायला सांगितले. दुकानाच्या बाहेरघ्या पंडालमधे ठेवलेल्या मुर्ती, रॅक, टेबल, खुर्च्या, सगळे आत दुकानात आणू लागले. कमलारुढ गणेशाची मुर्तीला आज खूप मागणी होती. तब्बल पन्नास मुर्ती विकल्या गेल्या होत्या. केवळ एक मुर्तीच (The Last Ganesha Idol) शिल्लक होती. जाउन थांबली. त्याच्या नजरेत एक वेगळीच भक्ती आनंदरावांना दिसली.

त्यानी रवीला सांगितले.. ‘रवी.. ‘ती’ मुर्ती घेउन ये..’

रवी ती कमलारुढ गणेशाची दुकानात उरलेली एकमेव मुर्ती रात्रीचे साडे नउ वाजता गणेश मुर्ती नेणारी शेवटच्या गणेश मंडळाची मुले येउन मूर्ती घेउन गेली व आनंदरावांनी पोरांना आवरायला घ्यायला सांगितले. दुकानाच्या बाहेरघ्या पंडालमधे ठेवलेल्या मुर्ती, रॅक, टेबल, खुर्च्या, सगळे आत दुकानात आणू लागले. कमलारुढ गणेशाची मुर्तीला आज खूप मागणी होती. तब्बल पन्नास मुर्ती विकल्या गेल्या होत्या. केवळ एक मुर्तीच (The Last Ganesha Idol) शिल्लक होती. घेउन आला.

‘अरे अण्णा..गणपती के बिना कैसे घर जाओगे..? सात बार मेरे दुकानमे आ के गये..लेकीन मुर्ती नही खरीदी.. ये मुझे नही चलेगा..तुम्हे ये मुर्ती अब खरीदनही पडेगी…बोलो..क्या करते हो..’

भाजीवाला अण्णा घाबरला..असं सारखं दुकानात येउन आपण चूक केली हे त्याला जाणवलं..

‘सॉरी सर..गलती हो गया..मेरा पास तो इतना पैसा नही..मतलब.. है..लेकीन कल का माल खरीदने के लिए वो चाहिये ना..? वो मै सब्जी बेचता..तो सुब्बा छे बजे मंडी मे जा के भाजी लेना पडता..सॉरी जाता मै..’ असे म्हणून पोराचा हात धरुन अण्णा निघाला.

पण आनंदरावांनी त्याचा हात पकडला.. ‘नही..गणपती तो तुमको घर ले जानाही पडेगा..वरना मै पुलीस को बुलाता देखो..’

पोलीस नाव ऐकताच तो पार गांगरुन गेला.. तो गडबडून म्हणाला.. ‘नही..मै लेता..ये मूर्ती..मै लेता..कितना देना मूर्तीका..?’

त्याने खिशात हात घालून आपली दिवसभराची सारी कमाई बाहेर काढली.

आनंदराव हसत त्याला म्हणाले..

‘दस रुपये…’

त्या दिवशी घरी जाताना भाजीवाल्या अण्णाच्या चेह-यावर केवळ अवर्णनीय आनंद होता..

अन अण्णाच्या गाड्यावर बसलेल्या त्याच्या मुलाच्या मांडीवर होती, आनंदरावांच्या दुकानातली, त्या दिवशी विकली गेलेली, प्रसन्न, श्वेतवर्णी अन कमलारुढ, नव्याशार भगव्या वस्त्रात झाकलेली, अशी ती..

शेवटची गणेश मुर्ती.. The Last Ganesha Idol

👆🏻बाप्पा सर्वांनाच असा आनंदनाभुव देण्या घेण्याची श्रीमंती देवो…🙏🏻

✍🏻श्री गणेशोत्सवाच्या🐘 Dil se शुभेच्छा🙏🏻✨🌷

I don’t know who has written this story but made me emotional.

शेवटची गणेश मुर्ती | The Last Ganesha Idol हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

शेवटची गणेश मुर्ती | The Last Ganesha Idol – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share शेवटची गणेश मुर्ती | The Last Ganesha Idol

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock