Manuski - Zavere Poonawala

माणूसकी | Manuski – Zavere Poonawala

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

हजारो कोटी रूपयांची उलाढाल करणारे पुण्यातील उद्योगपती झवेर पुणावाला यांचा ड्रायव्हर गंगादत्त याचे निधन झाले.

गंगादत्तचे निधन झाले तेव्हा पुणावाला पुण्यात नव्हते.
एका महत्वाच्या कामासाठी मुंबईला होते.
गंगादत्त निवर्तल्याची बातमी समजताच त्यांनी तात्काळ सर्व बैठका रद्द केल्या.
” मी येयेईपर्यंत अत्यंसंस्कार करू नका.. “
अशी विनंती गंगादत्तच्या कुटुंबियांना दूरध्वनीवरुन करत लगेच एका खाजगी हेलीकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली.

आयुष्यभर ड्रायव्हर म्हणून काम करीत असूनही आपल्या दोन्ही मुलांना पदवीपर्यंत शिकवणारा,.. इतकेच नाहीतर आपल्या मुलीला सी.ए .बनवण्यासाठी प्रोत्साहन देणारा गंगादत्त व सी. ए. होवून वडीलांची इच्छा पूर्ण करणारी त्यांची मुलगी…
अशा या कष्टाळू व जिद्दी गंगादत्त कुटुंबाबद्दल पूणावाला यांना अभिमान होता.

गंगादत्तच्या आठवणी जागवतच पुण्यात परतलेल्या पुणावाला यांनी गंगादत्त चालवत असलेल्या लिमोझीन गाडीतूनच त्याची अंत्ययात्रा काढण्याची ईच्छा त्यांच्या कुटूंबियांकडे व्यत्क केली.
या अचबिंत करणाऱ्या मागणीने गंगादत्तचे कुटूबिंय भारावुन गेले.
साश्रू नयनानीं त्यांनी होकार देताच तत्काळ लिमोझीन गाडी फुलांनी सजवली.
यानंतरची कृती पुणावाला यांची थक्क करणारी होती.

गंगादतचा शेवटचा प्रवास लिमोझीन मधून सुरु झाला.
आयुष्यभर आपली गाडी चालवणा-या गंगादत्तच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या शेवटच्या प्रवासात पुणावाला यांनी स्वत: गाडी चालवत अनोखी आदराजंली वाहिली.
कृतज्ञतेच्या या अनोख्या सारथ्यातून व्यक्त झालेल्या माणूसकीचा गहीवर उपस्थितांना हेलावून गेला.
उदरनिर्वाहासाठी नोकरीतून, व्यवसायातून पैसे सगळेच कमवतात. मात्र ज्याच्या जोरावर आपण कमावतो त्याच्या विषयी कृतज्ञता बाळगणारे कीती जण असतात…?
अशा उद्योगपतीस आमचा सलाम।

आपणही मोठ होतांना….. यशाची शिखर चढताना अनेकजण शिड्या होऊन …… कधी मदतनीस होऊन……..
कधी कर्तव्य कधी सेवा देवून … हातभार लावत असतात …
सगळ्यांची किंमत पैशाने करण्याची चूक करू नये.या साऱ्यांबद्दल केवळ कृतज्ञता बाळगा….
तरच खऱ्या अर्थाने यशाला सुवर्ण कोंदण लाभेल !!

माणूसकी – Manuski – Zavere Poonawala Source

ही कथा आवडली असल्यास शेअर करा.

आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share माणूसकी

You may also like

5 thoughts on “माणूसकी | Manuski – Zavere Poonawala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock